spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ganeshotsav 2024: महाराष्ट्रात विविध भागानुसार गौरीच्या नैवेद्याच्या पदार्थात असतो फरक ; जाणून घ्या सविस्तर

Ganeshotsav 2024: गणरायाच्या आगममनंतर पाठोपाठ आगमन होते ते गौरीचे. अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद महिन्यात ज्येष्ठा गौरीचे पूजन करतात. दुसऱ्या दिवशी पूजन आणि तिसऱ्या दिवशी तिचे विसर्जन केले जाते. यंदा ज्येष्ठा गौरी आवाहान हे १० सप्टेंबरला म्हणजे मंगळवारी केले जाणार आहे.

विविध ठिकाणी हा सण वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. कुठे हा सण गौरी गणपतीचा म्हटला जातो तर कुठे याला महालक्ष्मी पूजन असे म्हटले जाते. सणांची नावे बदलली जातात, तशाच पद्धतीही बदलल्या जातात. गौरीच्या आगमनानंतर कोकण भागातील काही ठिकाणी गौरी माहेरवाशिणीसोबत रात्र जागवली जाते. या दिवशी महिलावर्ग झिम्मा-फुगडी असे पारंपरिक खेळ खूप रात्रीपर्यंत खेळत असतात. महाराष्ट्रातील काही भागात गौरी बसवण्याच्या पद्धतीपासून नैवेद्याच्या पदार्थांमध्येही बदल घडतो.

कोकण
कोकण भागात या सणाला गौरी- गणपतीचा सण म्हटले जाते. गौरीला आगमनाच्या दिवशी तांदळाची भाकरीसह भाजीचा नैवेद्य दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी हळदीच्या पानातल्या पातोळ्या आणि भाज्यांचा नैवेद्य असतो. तर काही ठराविक भागात तिखटाचा नैवेद्य दाखवतात म्हणजेच तिखटाच्या नैवेद्यात मटण, चिकन, चिंबोऱ्या, मासे आणि कोंबडीवडे असे मासांहरी पदार्थ दाखवले जातात. पूर्वापार चालत आलेली ही परंपरा आजही पाळली जाते.

विदर्भ
महाराष्ट्रातील विदर्भात या सणाला महालक्ष्मीचा सण म्हटले जाते. या दिवशी गौरी आगमनाला भाजी- भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. तर काही ठिकाणी नैवेद्यात कांदा-लसूण वर्ज्य केले असते. महालक्ष्मीच्या नैवेद्यात विविध पदार्थ वाढले जातात. यात प्रामुख्याने कोशिंबीर, चटण्या,नकुल्यांची खीर, पंचामृत, १६ भाज्यांपासून तयार केलेली भाजी, वरण-भात, मोदक, पुरणपोळी, उडीद किंवा मुगाचे वडे, घोसाळ्याची किंवा अळूची भाजी, कढी, आंबील, तसेच फराळाच्या पदार्थात लाडू, करंजी, अनारसे हे पदार्थ बनवले जातात.

मराठवाडा
महाराष्ट्रातील मराठवाड्यात किंवा पश्चिम महाराष्ट्रात विदर्भासारखाच नैवेद्य असतो. १६ भाज्या, १६ कोशिंबिरी, १६ चटण्या, १६ पक्वान्ने तसेच फराळाचे पदार्थ करतात. गोडाच्या पदार्थांमध्ये काहीसा फरक पाहायला मिळतो. या ठिकाणी साखरेची पुरणपोळी नैवेद्यासाठी बनवली जाते. गौरी विसर्जनाच्या दिवशी या ठिकाणी दही-भात आणि मुरडीचे कानोले यांचा नैवेद्य देवीला दाखवला जातो.

हे ही वाचा:

Ganeshotsav 2024: एक वाटी गव्हाचे पीठ आणि झटपट मोदक तयार…

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना द्या खास शुभेच्छा!…

Ganeshotsav 2024: यंदाच्या गणपतीत बाप्पासाठी बनवा मूगडाळीचे पौष्टिक मोदक

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss