Ganeshotsav 2024: काय आहे गौरी-गणपतीचं नातं? जाणून घ्या सविस्तर

महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये गौराईला नैवेद्य दाखवण्याच्या जशा वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याचप्रमाणे विविध भागांमध्ये गौराई आणि गणपतीचे नातं नेमकं काय आहे? गौरी गणपतीची नक्की कोण? याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न आहेत.

Ganeshotsav 2024: काय आहे गौरी-गणपतीचं नातं? जाणून घ्या सविस्तर

७ सप्टेंबर रोजी आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे. सध्या संपूर्ण राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत आहे. बाप्पाच्या येण्याने सगळीकडे चैतन्यमय वातावरण पसरलेलं आहे. आता अशातच गौराईच्या येण्याची देखील अनेक जण वाट पाहत आहेत. १० सप्टेंबर रोजी गौराईचे आगमन होईल. या दिवशी गौराईचा साज शृंगार केला जातो. महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये गौराईला नैवेद्य दाखवण्याच्या जशा वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याचप्रमाणे विविध भागांमध्ये गौराई आणि गणपतीचे नातं नेमकं काय आहे? गौरी गणपतीची नक्की कोण? याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न आहेत.

गौरी म्हणजेच पार्वतीचेच रूप आणि गणपती हा गौरीचा पुत्र म्हणजेच गौरी गणपतीची आई आहे. परंतु राज्यातील काही भागांमध्ये काही भागात गौराईला गणपतीची बहीण तर काही ठिकाणी गौराईला गणपतीची बायकोदेखील मानले जाते. परंतु खरंतर गौरी ही गणपतीची आई आहे. ३ ते ४ दिवस आधी आलेल्या आपल्या बाळाला घेऊन जाण्यासाठी गौरी माहेरी येते. माहेरी आल्यावर दोन दिवस पाहुणचार घेऊन तिसऱ्या दिवशी निघून जाते. काही ठिकाणी गौरी आगमनाला महालक्ष्मीचे आगमन देखील म्हंटले जाते. गौरी आवाहनच्या पहिल्या दिवशी गौराईला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. तर गौरी पूजनाच्या दुसऱ्या दिवशी पुरणपोळी किंवा श्रीखंड पुरीचा नैवेद्य दाखवला जातो. काही ठिकाणी विविध प्रकारचे नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे.

गौरी म्हणजेच गणपतीची आई म्हणजेच पार्वती मानली जाते. काही ठिकाणी बहीण किंवा बायकोही मानलं जातं. बऱ्याच भागात गौरी म्हणजे गणपतीची बहीण मानली जाते. म्हणून ती भावाकडे पाहुणचारासाठी येते असं म्हणतात. महाराष्ट्राच्या काही भागात मुखवट्याच्या, फुलांच्या किंवा गौरीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. गौरी आवाहनाच्या दिवशी गौरींना घरी आणले जाते. त्यांना तुळशी वृंदावन जवळून घरात आणतात. तेव्हा लक्ष्मी प्रमाणे तिच्या पावलांचे ठसे संपूर्ण घरात उमटवले जातात. त्यानंतर स्थानापन्न केलं जातं.

हे ही वाचा:

सत्तेचा माज म्हणून मुलाला राहिला नाही कायद्याचा धाक…काय आहे Shivsena UBT चे ट्विट?

Mukhyamantri Tirth Yatra Darshan Yojana चे सुधारित निकष कोणते? कधीपर्यंत करायचा अर्ज?

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version