Ganeshotsav 2024: ज्येष्ठा गौरी विसर्जनाचा काय आहे शुभ मुहूर्त ? जाणून घ्या सविस्तर….

Ganeshotsav 2024: ज्येष्ठा गौरी विसर्जनाचा काय आहे शुभ मुहूर्त ? जाणून घ्या सविस्तर….

Ganeshotsav 2024: गणपती आगमनानंतर आता भाविक गौरी आगमनाच्या तयारीला लागले होते. गौराईची मनोभावे सेवा करून आता तिचे विसर्जन करण्याची वेळ आली. सोबतच ज्यांचे गौरीसह गणपती विसर्जित केले जातात त्यांचे गणपती बाप्पा सुध्दा उद्या निरोप घेतील. इतके दिवस गजबजलेली घरे विसर्जनानंतर सूने पडतील.

घरोघरी गौराईंचे स्वागत करण्यात आले. माहेरवाशीण गौराईचं आवाहन झालं. त्यानंतर आज गौरी-गणपतीचं विसर्जन होणार आहे.भाविक आपल्या लाडक्या बाप्पासह गौरीईलाही निरोप देणार आहेत. गौरी-गणपतीच्या आगमनासाठी भाविक जवळजवळ महिनाभर आधीपासून तयारी सुरु करतात. मखर सजावटीसाठी भक्त खूप मेहनत घेतात. त्यानंतर शेवटी लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ येते. परंतु तेव्हा सर्व भक्तांचे डोळे पाणावतात.

विसर्जाच्या या दिवशी शुभ मुहूर्तावर गौरींची विधीवत पूजा करून आरती केली जाते आणि त्यानंतर मुर्तीचे मुकूट किंचित हलवून गौरींना निरोप दिला जातो. रांगोळी काढून हळदी-कुंकवाने गौरींची मार्गस्त पावले काढली जातात आणि गौरीचे विसर्जन केले जाते. काही ठिकाणी गौरींच्या मुर्ती विसर्जित केल्या जातात तर काही ठिकाणी त्याच मूर्ती दरवर्षी पारंपरिक पद्धतीने वापरण्याची प्रथा असते. परंतु या पारंपरिक पद्धतीत बऱ्याच ठिकाणी विविधता पाहायला मिळते.

गौरी विसर्जनाचा मुहूर्त
मंगळवारी १० सप्टेंबरला गौराईचं सोन पावलांनी आगमन झालं. मंगळवारी गौरी आवाहन पार पडलं. माहेरवाशीण गौराईला पंचपक्वानांचा नैवेद्य दाखवत तिची विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर आज १२ सप्टेंबरला गुरुवारी गौराईचं विसर्जन होणार आहे. गौरी विसर्जन गुरुवारी संपूर्ण दिवसभरात कधीही करता येणार आहे. १२ सप्टेंबरला मूळ नक्षत्रावर गौरीचे विसर्जन करायचे असून रात्री १० वाजेपर्यंत म्हणजे दिवसभरात कधीही गौरी विसर्जन करु शकतो.यादरम्यान भक्त आपल्या सोयीनुसार गौरी विसर्जन करु शकणार आहेत.

Exit mobile version