spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ganeshotsav 2024: अष्टविनायकांपैकी सर्वात पहिला गणपती कोणता ? काय आहे त्याचे वाहन ?

अष्टविनायकांपैकी सर्वात पहिला गणपती म्हणून ओळखला जाणारा गणपती म्हणजे 'मोरेश्वर'. हे अत्यंत सुंदर तसेच नवसाला पावणारे मंदिर आहे.

Ganeshotsav 2024: अष्टविनायकांपैकी सर्वात पहिला गणपती म्हणून ओळखला जाणारा गणपती म्हणजे ‘मोरेश्वर’. हे अत्यंत सुंदर तसेच नवसाला पावणारे मंदिर आहे. त्याला मोरेश्वर किंवा मयूरेश्वर या नावाने सुद्धा ओळखले जाते.मयुरेश्वर किंवा मोरेश्वर जे भगवान श्रीगणेशाच्या अष्टविनायक मंदिरामधील एक मंदिर आहे. हे मंदिर महाराष्ट्रातील मोरगाव येथे क-हा नदीच्या काठावर वसले आहे. मोरगाव पुण्यापासून कमीतकमी ८० किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. हे क्षेत्र भूस्वानंद नावानेसुद्धा ओळखले जाते, याचा अर्थ ‘सुख-समृद्ध भूमी’ असा होतो. या अवतारामध्ये श्रीगणेशाचे वाहन मोर होते, यामुळे ही मूर्तीला मयुरेश्वर याच नावाने ओळखली जाऊ लागली.

येथे त्रेतायुग अवतार रुपात श्रीगणेश स्थित आहेत.
मोरगावचे मयुरेश्वर मंदिर अष्टविनायकाच्या आठ प्रमुख मंदिरांमधील एक आहे. अष्टविनायकांची मंदिरे (स्थळे) महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहेत. भगवान ब्रह्मदेव यांनी श्रीगणेशाच्या प्रत्येक युगातील अवताराची भविष्यवाणी केली होती, मयुरेश्वर श्रीगणेशाचा त्रेतायुगातील अवतार आहे.

मोरेश्वराचे मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आले असून ते बहामनी काळात बांधले गेले आहे. गावाच्या मध्यभागी असलेल्या या देवळाला चारही बाजूंनी मनोरे आहेत. मोगल काळात देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून या देवळाला मशिदीसारखा आकार दिला आहे. देवळाच्या बाजूने ५० फूट उंचीची संरक्षण भिंत आहे. गाभार्‍यातील मयूरेश्वराची मूर्ती बैठी, डाव्या सोंडेची, पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक आहे. मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवले गेले आहेत. मस्तकावर नागराजाचा फणा आहे. मूर्तीच्या डाव्या- उजव्या बाजूस ऋद्धिसिद्धीच्या पितळी मूर्ती असून पुढे मूषक(उंदीर) व मयूर (मोर)आहेत.

मोरेश्वराची मूर्ती कोणी घडवली ?
या मंदिरात मयूरेश्वरासोबत ऋद्धी आणि सिद्धी यांच्याही मूर्ती आहेत. असे म्हंटले जाते की, ब्रम्हदेवाने दोन वेळा मयूरेश्वराच्या मूर्तीला बनवले आहे. पहिली मूर्ती बनवल्यावर ‍ती सिंधुसुराने तोडली त्यामुळे ब्रम्हदेवाने पुन्हा एकदा ही मूर्ती घडवली.

मोरगाव या गावाचे नाव कसे पडले ?
हे गाव प्राचीन काळी मोराच्या आकारासारखे होते. त्याचबरोबर येथे मोठ्या संख्येने मोरांचे वास्तव्य आढळून येते. याच कारणामुळे हे ठिकाण मोरगाव नावाने प्रसिद्ध झाले.

हे ही वाचा:

Ganeshotsav 2024: एक वाटी गव्हाचे पीठ आणि झटपट मोदक तयार…

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना द्या खास शुभेच्छा!…

Ganeshotsav 2024: यंदाच्या गणपतीत बाप्पासाठी बनवा मूगडाळीचे पौष्टिक मोदक

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss