spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ganeshotsav 2024 : पालीच्या गणपतीला बल्लाळेश्वर नाव का पडले ?

महाराष्ट्रामधील पाली येथील पालीचा श्री बल्लाळेश्वर विनायक मंदिर प्रसिद्ध असे मंदिर आहे. महाराष्ट्रच्या पुण्यापासून ११० किमी अंतरावर असलेला पालीचा विनायक मंदिर आहे. नाना फडणीस यांनी १७७० मध्ये बांधलेला या मंदिराला पाली येथील बल्लाळ याचे नाव देण्यात आले. तसेच प्रमुख देवता बल्लाळेश्वर (गणपती) आहे.

मंदिरातील विनायकाची मूर्ती ३ फूट उंच आहे. विनायकाच्या मुर्तीला त्याच्या पत्नी रिद्धी व सिद्धी गणेशाच्या प्रतिमेला टेकतात. मंदिराच्या मागील भाग मध्ये धुंडी विनायक म्हणून ओळखले जाणारे आणखी एक गणेश मंदिर आहे. त्या मंदिरा मध्ये पेशव्यांनी त्याच्या काळा मध्ये मंदिरात पेशव्यांनी पोर्तुगीज बनावटीची मोठा घंटा बसवण्यात आला होता. हि मूर्ती स्वयंभू असून या गणेश मूर्तीचे कपाळ विशाल आहे.

पालीच्या या गणपतीला बल्लाळेश्वर नाव का पडले?

त्रेता युगातील हि कथा आहे. पाली या गावामध्ये कल्याण नावाचा एक वाणी आपल्या पत्नी सोबत राहत होता. त्या दांपत्याना बल्लाळ नावाचा मुलगा होता. तो गणपतीचा चा खूप मोठा भक्त होता. त्यामुळे त्या त्याने मित्रांना देखील गणेश भक्ती मध्ये सामावून घेतले होते. एके दिवशी बल्लाळ आणि त्याच्या मित्रांना खेळत असताना गावाबाहेर एक मोठा दगड आढळून आला. तो त्याचे मित्र त्या दगडाला पूजा करू लागले. बल्लाळ व त्याचे मित्र गणपतीच्या पूजे मध्ये एवढे मग्न असायचे. त्यामुळे गावातील इतर मुलाच्या पालकांनी त्याची तक्रार त्याच्या वडिलांकडे केली. त्याच्या वडिलांना क्रोध अनावर झाला आणि संतापाच्या भरात त्यानी ते गणपतीचे देऊळ मोडून टाकले . व बल्लाळा हि रक्तबांभळ होई पर्यंत मारलं व झाडाला बांधून ठेवले. तो गणपतीचे नाम जप करत होता. त्याची हि गणेश भक्ती पाहून गणपती एका ब्राह्मणाच्या वेशात आले. बल्लाळाने त्याना ओळखले आणि गणपतीच्या नतमस्तक झाला. त्याला एक वर मागायला सांगितले. त्यावर त्यानी तिथेच राहण्यास सांगितले व लोकांचे दुःख दूर करण्याचा वर मागितला. तेव्हा गणपती म्हणाले माझा एक अंश इथे राहील आणि माझ्या नावाच्या आधी तुझे नाव घेतील. लोक मला बल्लाळ विनायक नावानी ओळखतील असे म्हणून गणपतीने जवळच्या दगडामध्ये लुप्त झाला. त्यामुळे आपण त्या मूर्तीला बल्लाळेश्वर विनायक म्हणून ओळखतो.

हे ही वाचा:

Akshay Kumar च्या वाढदिवसानिमित्त ‘भूत बंगला’ चित्रपटाची घोषणा…

Ganeshotsav 2024: लाडक्या गणेशाला रेड वेलवेट मोदकचा नैवेद्य…जाणून घ्या रेसिपी

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss