spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ganeshotsav 2024: विघ्नहर्ता गणरायाला लाल रंग का प्रिय आहे ? काय आहे त्याचे महत्त्व जाणून घेऊयात

Ganeshotsav 2024: आपण सर्वजण कोणत्याही शुभकार्याची सुरुवात गणपती बाप्पाला वंदन करूनच करतो. सर्वांचे आराध्य दैवत असलेल्या श्रीगणेशाला लाल रंग प्रिय आहे. लाल रंगासोबत गणपतीचे अतूट नाते आहे. त्याबद्दल पुराणकथा आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. लाल रंग हा गणपतीच्या मूर्तीकलेत अविभाज्य भाग मानला जातो.

गणपती बाप्पाला लाल गंध, लाल वस्त्र, लाल जास्वंदीचे फुल अतिशय प्रिय आहे असे अथर्वशीर्षतून समजून येते. कारण त्यात असे वर्णन केले आहे की, रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम् । रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैस्सुपूजितम् ॥

लाल रंग म्हणजे ऊर्जा, चैतन्य उत्कटता,भक्ती आणि सामर्थ्यचे प्रतिक आहे. हे सर्व गुण भगवान गणेशाला आत्मसात आहेत. लाल रंग त्यांच्या गतिशील आणि सामर्थ्यवान स्वभावाचे प्रतिबिंब दाखवतो. भक्तांना धैर्य आणि निर्धारासाठी त्यांचे आशीर्वाद घेण्यास प्रेरणा देतो. लाल रंग म्हणजे गणेशाच्या भक्तांच्या मनात त्यांच्याबद्दल असलेले अगाध प्रेम आणि श्रद्धेचे प्रतिबिंब आहे. लाल फुले, कपडे आणि सिंदूर हे सुध्दा गणपती बाप्पाच्या पूजेत अनिवार्य मानले जातात. लाल रंगात संरक्षणात्मक गुण आहेत, जे वाईट नकारात्मक शक्तींना दूर ठेवतात. आपल्या भक्तांचे रक्षक म्हणून श्री गणेशाचा लाल रंगाशी असलेला संबंध पालक म्हणून त्यांची भूमिका अधिक दृढ करतो, त्यांच्या सुरक्षिततेची खात्री करतो.

पूजा आणि समारंभाच्या वेळी हातात लाल धागा बांधला जातो तो भक्त आणि दैव यांच्यातील संबंध दर्शवितो. हा पवित्र धागा अनेकदा भगवान गणेशाशी जोडला जातो. लाल रंगाने भगवान गणेशाचे चित्रण करण्याची तमिळ परंपरा आहे. त्याचप्रमाणे मंगळ ग्रहाशी संबंधित लाल रंगाचे ज्योतिषीय महत्त्व देखील आहे. लाल रंग गणेशाच्या बलवान आणि धाडसी स्वभावाचे प्रतिनिधित्व करतो. लाल रंगाशी असलेला त्याचा संबंध आव्हानांवर मात करण्याची त्याची क्षमता दर्शवून देतो.

हे ही वाचा:

Sharad Pawar यांच्या डोक्यात काय चाललंय हे तुम्हाला शंभर वर्ष कळणार नाही; Sanjay Raut यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका

Congress, Sharad Pawar गट मुख्यमंत्रीपदासाठी Uddhav Thackeray यांचे नाव कधीही घोषित करणार नाहीत, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचे मोठे विधान

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss