spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ganpati Visarjan : लाडक्या बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळी महानगरपालिकेने दिलेल्या ‘या’ सूचनांचे पालन करा; विसर्जनादरम्यान कशी घ्याल काळजी ?

Ganpati Visarjan : उद्या मंगळवारी १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीनिमित्त मुंबईतील गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, शिवाजी पार्क यांसह ठिकठिकाणी मोठ्या गणेशमुर्तीं विसर्जन सोहळा पार पडणार आहे. त्याकरिता मुंबई महानगरपालिकेने विशेष सज्जता केली आहे. यावर्षी विसर्जन सोहळ्यासाठी मुंबईतील विविध चौपाट्यांवर ७६१ जीवरक्षक, ४८ मोटरबोटी, २३ हजार ४०० पोलीस कर्मचारीही तैनात केले गेले आहेत. रक्षकांसोबतच १६३ निर्माल्य कलश व २७४ निर्माल्य वाहनांचीही सोय केली गेली आहे.

विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी मुंबई महानगरपालिकेचे सुमारे १२ हजार अधिकारी ज्यात कर्मचारी, डॉक्टर यांचा समावेश असून इतके लोक उद्या कार्यरत असणार आहेत. त्यासोबतच चौपाट्यांवर नियंत्रण कक्ष, डॉक्टरांची सुविधा, अग्निशमन केंद्राचे जवान, कोस्टगार्ड आणि टेहाळणी बूरूजसह विविध सोयीसुविधांची तयारी केली गेली आली आहे. त्याचप्रमाणे ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधी दरम्यान मुंबईतील समुद्राच्या किनारपट्टीवर ‘ब्लू बटन जेलीफीश’, ‘स्टिंग रे’, ‘वॉर्म’ असे अनेक मासे दिसून येतात. त्यांच्यापासून दक्षता बाळगावी असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. जर मत्स्यदंश झाल्यास चौपाटी परिसरात असलेल्या वैद्यकीय कक्षातर्फे मदत घ्यावी. तसेच चौपाट्यांवर १०८ रूग्णवाहिका सुद्धा तैनात केल्या जाणार आहेत.

विसर्जनादरम्यान घ्यायची काळजी:
१. समुद्रात जास्त आत पाण्याजवळ जाण्याचा प्रयत्न करु नका.
२. मूर्ती विसर्जनासाठी महापालिकेतर्फे नेमणूक केली गेलेल्या प्रशिक्षित व्यक्तींची मदत घ्या.
३. काळोख असणाऱ्या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनासाठी जाणे टाळा.
४. महानगरपालिकेने पोहण्याकरीता निषिद्ध केलेल्या क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न करू नये.
५. समुद्रात किंवा तलावात कुणी बुडत असल्याचे नजरेस आल्यास लगेचच अग्निशमन दलाचे जवान, पोलिस किंवा जीवनरक्षकांना सूचित करा.
६. अफवा पसरवू नका किंवा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.
७. विसर्जन सोहळ्यावेळी आपल्या लहान मुलांची विशेष काळजी घ्या, त्यांना पाण्याजवळ जाऊ देऊ नका.

हे ही वाचा:

Nitesh Rane यांच्या मुस्लिमविरोधी वक्तव्यावर Ambadas Danve यांचा टोला; गल्लीत डझनभर केळी विकत घेणे आणि देश चालवणे यात फरक…

Rajkot Fort: Chetan Patil चा जामीन अर्ज फेटाळला तर Jaydeep Apte च्या न्यायालयीन कोठडीत वाढ

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss