Gauri Pujan: ज्येष्ठा गौरी पूजनाचे काय आहे महत्त्व ? त्याचबरोबर जाणून घ्या साहित्य यादी

Gauri Pujan: ज्येष्ठा गौरी पूजनाचे काय आहे महत्त्व ? त्याचबरोबर जाणून घ्या साहित्य यादी

Gauri Pujan: आज ज्येष्ठा गौरी पूजन. अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन तर मुळ नक्षत्रावर विसर्जन केलं जातं. गणपती आगमनाची जशी गडबड सुरू असते तशीच आता गौरी घरात येणार म्हटल्यावर महिलांची अगदी गडबड पाहायला मिळते. गौरी पूजन करणे म्हणजे महाशक्तीचं पूजन करणे. ही महाशक्ती म्हणजे पार्वती देवी आहे. घरात भरभराट, आनंद , ऐश्वर्य सतत राहण्यासाठी गौरी पूजन महिला करतात. सीतेने गौरी पूजा करून वरदहस्त मिळवला असा उल्लेख तुलसी रामायणात केला गेला आहे. म्हणूनच आज आपण या पूजनासाठी कोणते साहित्य गरजेचं असते हे पाहूया.

गौरी पूजन करताना सर्व साहित्याची तयारी आधीच करून ठेवली तर आयत्यावेळी होणारी गोंधळ आणि धावपळ होणार नाही. विविध प्रांतांनुसार गौरी पूजनासाठी खास नैवेद्य असतो काही ठिकाणी सोळा भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो तर काही ठिकाणी मांसाहाराच्या आणि पातोळयांचा नैवेद्य दाखवला जातो.

गौरीचे आवाहन करण्याच्या प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या पद्धती आहेत. काहीजणी सोने, चांदी, पितळ यांचे मुखवटे किंवा मातीच्या मुखवट्याची पूजा करतात. तर काहीजणी सुघट (मातीचे भांडे) घेवून, किंवा वाहत्या पाण्याच्या खड्यांवर गौरीचे आवाहन करतात. काहीजणांच्या घरी उभ्या गौरी पूजन केलेलं जाते, त्यांना साडी नेसवून, दागदागिने घालून त्यांची पूजा केली जाते. कुळाचाराने गौरीपूजनाची जी पद्धत आणि परंपरा चालत आलेली आहे त्याचप्रमाने गौरी पूजन ठिकठिकाणी केले जाते.

गौरी पूजनाचे साहित्य:
तांब्याचा तांब्या, ताम्हण, पळी, फुलपात्रे, पत्री – (बेल, आघाडा, मालती, दुर्वा, चाफा, कण्हेर, बोरी, रुई, तुळस, डाळींब, धोत्रा, बकुळ, अशोक) पूजेचे ताट, नीरांजन, समई, धूपपात्र, कर्पूरपात्र, घंटा. ही सर्व उपकरणों तांब्याची किंवा चांदीची असावीत हळद, कुंकू, गंध, अक्षता, गुलाल, अबीर, विड्याची पाने, सुपाऱ्या, नारळ, गुळखोबरे, खारका, बदाम, पांच प्रकारची फळे, सुगंधी तेल, (पंचामृतासाठीं दूध, दही, तूप, मध, साखर), तांदूळ, गहू, सुटी नाणी. विविध फुलें,

गौरीचे दागिने, अलंकार
मणिमंगळसूत्र, बांगड्या, साडी, हिरवी चोळी, खण, इतर आवडीप्रमाणे दागिने.

हे ही वाचा:

Nagpur Hit and Run Case: Chandrashekhar Bawankule यांच्या परिवाराचा संबंध नाहीये मग लपवाछपवी का चाललीय? :Sanjay Raut

BJP चा अंतर्गत सर्व्हे आला समोर लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज; Rohit Pawar यांचा दावा

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version