spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

हरतालिकेच्या शुभ मुहूर्तावर काढा अशा सोप्या पद्धतीने ‘मेहंदी’

आम्ही तुमच्यासाठी मेहंदीच्या काही साध्या आणि नवीन डिझाइन्स घेऊन आलो आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमच्या हातांचे सौंदर्य वाढवू शकता.

उद्या विवाहित महिला हरतालिकेचा उपवास करतील. अशा स्थितीत पार्लरमध्ये मेहंदी लावण्यासाठी आज पार्लरमध्ये महिलांची गर्दी होणार आहे. कोणताही सण असो, स्त्रिया नक्कीच मेहंदी लावतात. दरवर्षी एकापेक्षा जास्त मेहंदीचे डिझाईन लोक हातावर काढतात.काहींना हातभर मेहंदी काढायला आवडते तर काहींना अगदीच मोजकी, लहान आणि साधी मेहंदी काढायला आवडते. पण गणेशोत्सवाच्या घाईगडबडीत झटपट मेहंदी कशी काढायची? किंवा नक्की कोणती मेहंदी काढायची असा प्रश्न जर तुम्हालाही पडला असेल तर आम्ही तुमच्यासाठी मेहंदीच्या काही साध्या आणि नवीन डिझाइन्स घेऊन आलो आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमच्या हातांचे सौंदर्य वाढवू शकता.

  1. साधी मेहंदी:
    अनेकांना किचकट आणी भलीमोठी मेहंदी काढायला आवडत नाही. त्याचबरोबर हरतालिकेच्या आदल्या दिवशी काहींना मेहंदी काढणं त्यानंतर रात्री सुकवणे हे स्त्रियांसाठी थोडं कठीण काम ठरू शकतं. त्यामुळे इथे दाखवल्याप्रमाणे छोटी आणि साधी मेहंदी तुम्ही काढू शकता.

mehandi

2. गोलाकार मेहंदी:
ही मेहंदी डिझाइन देखील अतिशय सोपे आणि नवीनतम आहे. त्यात फक्त एक मोठे वर्तुळाकार बनवले आहे. आणि मनगटावर गोटा पट्टीसारखी रचना केली जाते. त्याचप्रमाणे, सेम डिजाइन हाताच्या मागच्या काढून पटकन काढून होणारी अशी मेहंदी तुम्ही काढू शकता.

Mehandi

3. तळहातावरची मेहंदी:
तुम्हाला जर फार मोठीच मेहंदी काढायची नसेल तर साधी डिजाइन तळावर काढून तुम्ही एक झटपट मेहंदी तुमच्या हातावर काढू शकता. त्यातही जर तुम्ही एखादी बारीक डिजाईन काढलीत तर ती लवकर सुकेल आणि गणेशोत्सवादरम्यान तुम्ही तुमची कामं करू शकता.

Mehandi

4. पायावरील मेहंदी:
हरतालिकेच्या दिवशी स्त्रिया फक्त हातावरच मेहंदी काढत नाहीत तर काहीजणी पायावरदेखील मेहंदी काढणं पसंत करतात. त्यामुळे फोटोत दाखवल्याप्रमाणे तुम्हीही तुमच्या पायावर छान, आखीव – रेखीव मेहंदी काढून तुमच्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करू शकता.

Mehandi

हे ही वाचा:

‘जय भवानी जय शिवराय’ म्हणत ‘शिवप्रताप–गरुडझेप’ चित्रपटातील गाणे आले प्रेक्षकांच्या भेटीला

शिवाजीपार्कमधील दसऱ्या मेळाव्याच्या मुद्द्यांवर उद्धव ठाकरेंनी सोडले मौन म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss