सणासुदीला करा खुसखुशीत करंज्या, या टिप्स लक्षात ठेवा

श्रावण महिना संपल्यानंतर सणांची मालिका सुरूच असते. गणेशोत्सव, दसरा,दिवाळी अशा सणवाराला करंजी हा आपला पारंपरिक पदार्थ करावाच लागतो.

सणासुदीला करा खुसखुशीत करंज्या, या टिप्स लक्षात ठेवा

श्रावण महिना संपल्यानंतर सणांची मालिका सुरूच असते. गणेशोत्सव, दसरा,दिवाळी अशा सणवाराला करंजी हा आपला पारंपरिक पदार्थ करावाच लागतो. पण करंजी करणं हे अजिबात सोपं काम नाही. कधी करंजीचा खुळखुळा होऊन जातो, तर कधी करंजी खूपच वातड- कडक होऊन जाते. कधी कधी करंजीचे तुकडे पडायला लागतात, तर कधी करंजी तुटतच नाही. करंजीचे प्रयोग अनेक जणींचे अनेक वेळा फसलेले आहेत. त्यामुळेच तर यंदा गौरी गणपतीसाठी करंजी करत असाल, तर या काही टिप्स नक्की ट्राय करून बघा. नेहमीपेक्षा यावेळी तुमची करंजी निश्चितच अधिक चवदार आणि खुसखुशीत होईल.

टिप्स  – 

  1. करंजी कडक होऊ नये म्हणून रवा आणि मैदा यांचं प्रमाण अचूक असणे गरजेचे आहे. तसंच रवा आणि मैदा पाण्यात किंवा अर्धे पाणी, अर्धे दूध घेऊन भिजविण्यापेक्षा पुर्णपणे दुधात भिजवावे. भिजवताना त्यात थोडी साय आणि गरम केलेले साजूक तूपही टाकावे. त्यामुळे करंजी अजिबात कडक होणार नाही. शिवाय करंजीच्या कडा बरेच दिवस मऊ राहतील.
  2. रवा आणि मैद्याचं पीठ भिजवल्यानंतर लगेचच त्याच्या करंज्या करायला घेऊ नयेत. कमीतकमी १ तास तरी पीठ नीट भिजू द्या. हे पीठ तुम्ही जेवढं जास्तीतजास्त मळाल तेवढ्या त्याच्या करंज्या जास्त चांगल्याच खुसखुशीत होतील. त्यामुळे पीठ मळण्याचा तुमचा त्रास वाचेल.
  3. जे पीठ चांगलं मळलेलं असेल, त्याच्या करंज्या फाटत नाहीत. शिवाय करंजीसाठी घेतलेला गोळा खूप पातळ लाटू नये. करंजीचं पीठ कधीही उघडे ठेवू नये. त्याच्यावर झाकण टाकावं किंवा मग स्वच्छ कपडा ओला करून टाकावा. शिवाय करंजीच्या कडा एकावर एक टाकून जेव्हा दाबाल त्याआधी तिच्या काठांना बोटाने थोडंसं पाणी लावून घ्यावं. जेणेकरून टोके घट्ट चिकटतील आणि कढईत टाकल्यानंतर फुटणार नाहीत.
  4. करंजी तळताना नेहमी साजूक तुपात तळावी. तसेच खूप जास्त वेळा हलवून नये. खूप लालसर होईपर्यंत तळू नये. मग तुमच्या खुसखुशीत करंज्या तयार…

हे ही वाचा :

केदार शिंदेंची कन्या झळकणार ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटांमध्ये, महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार

भारतीय नौदलालाचा नवा झेंडा छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version