spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Lalbaugcha Raja 2024 First Look Watch Video: लालबागच्या राजाची पहिली झलक आली समोर

अवघ्या दोन दिवसांनी अनेकी ठिकाणी गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) चा सण मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा करण्यात येणारआहे. त्याचबरोबर घरातील गणपतींसह सार्वजनिक गणेश मंडळांची सजावटीची तयारी अंतिम टप्प्यावर आली आहे. अशातच आज ५ सप्टेंबरच्या संध्याकाळी नवसाला पावणारा बाप्पा म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या राजा (Lalbaugcha Raja) चे पहिले मुखदर्शन दाखवण्यात आले. लालबागच्या राजाचा फर्स्ट लुक लालबाग राजाच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाइव्ह स्ट्रीम करण्यात आले होते. त्याचप्रमाणे टाईम महाराष्ट्राच्या फेसबुक आणि युट्युबच्या माध्यमातून लालबागच्या राजाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. अखेर लालबागच्या राजाची झलक गणेश भक्तांना पाहायला मिळाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या देखील डोळे दीपतील असे लालबागच्या राजाचे सुंदर रूप पाहायला मिळाले. मरून रंगाच्या वेल्वेटच्या पितांबरमधील राजाचे हे रूप डोळ्याचे पारणे फेडणारे आहे.

लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) हे मुंबईतील सार्वजनिक गणपती मंडळ आहे. या मंडळाची स्थापना १९३४ साली करण्यात आली. कोळी समाजामध्ये प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या राजाला नवसाला पावणारा राजा म्हणून ओळखले जाते. मुंबईत ठिकठिकाणी गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) च्या आधी गणपतीचे आगमन केले जाते. लालबागचा राजाही आता पहिला लूक आपल्या सर्वांसमोर आला आहे.

हे ही वाचा:

इकोफ्रेंडली सुंदर माझा बाप्पा स्पर्धा २०२४

टाईम महाराष्ट्र आयोजित “इकोफ्रेंडली सुंदर माझा बाप्पा!” गणेशोत्सव स्पर्धा २०२४

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss