Lalbaughcha Raja ला गणेशभक्तांचं भरभरुन दान, ५ कोटी ६५ लाख जमा तर…

संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मुंबईतील लालबागचा राजा येथील गणपती प्रसिद्ध आहे.

Lalbaughcha Raja ला गणेशभक्तांचं भरभरुन दान, ५ कोटी ६५ लाख जमा तर…

७ सप्टेंबरला गणरायाचं आगमन होणार आहे. तत्पूर्वीच लालबागच्या राजाचा पहिला फोटो समोर आला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मुंबईतील लालबागचा राजा येथील गणपती प्रसिद्ध आहे. लालबागचा राजा हा ‘इच्छापूर्ती करणारा गणपती’ किंवा ‘नवसाला पावणारा गणपती’ म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. गणेशोत्सवाच्या काळात गणेशभक्त राजाच्या दर्शनासाठी रांगाच रांगा लावतात. लालबागच्या राजाची स्थापना इ.स. १९३४ साली करण्यात आली. काही कोळी आणि व्यापारी बंधूंची नवस पूर्ती झाल्यामुळे लालबागमध्ये गणरायाची स्थापना करण्यास सुरुवात झाली. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गणेशभक्त मोठ्या संख्येनं येत असतात. दरवर्षी गणेशोत्सवात लालबागच्या राजाला भाविक रोख रक्कम, सोने आणि चांदीच्या स्वरुपात दान करत असतात. गेल्या काही वर्षांपासून या दानामध्ये वाढ होतं असल्याचं चित्र समोर आले आहे.

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विद्यमाने यंदा लालबागच्या राजाचा ९१ वा गणेशोत्सव ७ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर या कालावधीत पार पडला. लालबागच्या राजाला होत असलेल्या दानाची मोजदाद सुरु करण्यात आली होती. या दानाची रक्कम मोजून पूर्ण झाली आहे. गणेशोत्सव काळात लालबागच्या राजाच्या चरणी ५ कोटी ६५ लाख ९० हजार रोख रुपये दान केले आहेत. ७ सप्टेंबर पासून २० सप्टेंबर पर्यंत लालबाग राजा चरणी आलेल्या रोख रकमेची मोजदाद सुरु होती. ही मोजदाद पूर्ण झाली आहे. तर, ४१५१. ३६० ग्रॅम सोनं लालबागच्या राजा चरणी भक्तांकडून अर्पण करण्यात आलं आहे. तर ६४३२१ ग्राम चांदी लालबागच्या राजाच्या चरणी दान म्हणून अर्पण करण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र त्यासोबतच लालबाग राजाच्या पदाधिकाऱ्यांकडून हे मोजदाद सुरू होती. आज म्हणजेच २१ सप्टेंबरला लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण करण्यात आलेल्या वस्तूंचा लिलाव केला जाणार आहे.

हे ही वाचा:

इकोफ्रेंडली सुंदर माझा बाप्पा स्पर्धा २०२४

टाईम महाराष्ट्र आयोजित “इकोफ्रेंडली सुंदर माझा बाप्पा!” गणेशोत्सव स्पर्धा २०२४

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version