पहाटेपासून बाप्पाच्या प्रतिष्ठापनेसाठी मुहूर्त

उद्या दि. ३१ ऑगस्ट रोजी सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन हे होणार आहे. सर्वांची लगबग हि जोरदार सुरु झाली आहे.

पहाटेपासून बाप्पाच्या प्रतिष्ठापनेसाठी मुहूर्त

उद्या दि. ३१ ऑगस्ट रोजी सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन हे होणार आहे. सर्वांची लगबग हि जोरदार सुरु झाली आहे. यंदाच्या वर्षी बाप्पाचा मुहूर्त हा ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे ४ वाजून ४८ मिनिटे ते दुपारी १ वाजून ५४ मिनिटांपर्यंत आहे. घरोघरी आपल्या सोयीनुसार गणरायाची प्रतिष्ठापना करता येईल. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना मध्यान्हानंतर गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करता येऊ शकेल.

‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ या जयघोषात बाप्पाची मूर्ती घराघरांत आणली जाते. दारात मुर्तीचे पाय धुवून, अक्षता अर्पण करुन औक्षण केलं जातं. त्यानंतर पाटावर किंवा चौरंगावर मुर्तीची स्थापना केली जाते. गणरायाच्या स्थापनेसाठी सर्वात आधी पाटावर किंवा चौरंगावर लाल वस्त्र अंथरुन त्यावर मूर्ती ठेवली जाते. मुर्तीवर गंगाजल शिपडून देवाला जानवं घातलं जातं. सर्वात आधी गणरायाला पंचामृताने स्नान घालून केशर, चंदन, अक्षता, दुर्वा, फुले, दक्षिणा अर्पण केली जाते. त्यानंतर घरातील सर्व मंडळी गणरायाची पूजा करतात. आरती करुन बाप्पाला प्रिय असणाऱ्या मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो.

हे ही वाचा :-  गणपतीला दुर्वा का वाहावी ? माहित नसे तर नक्की वाचा

आपल्या श्रद्धेप्रमाणे घराघरांत दीड, पाच, सात आणि दहा दिवस गणरायाची सेवा केली जाते. या दिवसांमध्ये रोज बाप्पाची पूजा करुन त्याला गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. शेवटच्या दिवशी जागरण करुन खेळ खेळले जातात. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषात बाप्पाला ठरलेल्या वेळी निरोप दिला जातो. पुढच्या वर्षी पुन्हा बाप्पाच्या आगमनाची प्रतिक्षा केली जाते.

हे ही वाचा :-  गणेश चतुर्थीला या ५ मंत्रांचा जप करा, गणपती बाप्पा तुमच्या मनोकामना पूर्ण करेल

भद्रादि (विष्टि) कोणतेही कुयोग वर्ज्य करण्याची किंवा विशिष्ट मुहूर्त वेळेची आवश्यकता नाही. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना मध्यान्हानंतर गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करता येऊ शकेल. शनिवारी (ता. ३) गौरी आगमन होणार असून या दिवशी अनुराधा नक्षत्र दिवसभर असल्याने दिवसभरात आपल्या सवडीनुसार केव्हाही गौरी आवाहन करता येईल. रविवारी (ता. ४) गौरी पूजन करावे, तर सोमवारी (ता. ५) मूळ नक्षत्रावर रात्री आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत केव्हाही गौरी आणि गणपतीचे विसर्जन करावे.

हे ही वाचा :- 

गणेशोत्सवानिम्मित जाणून घेऊया गणपतीपुळेचा इतिहास

यंदा बाप्पाच्या दर्शनासाठी काही खास आमंत्रण पत्रिका

गणेश चतुर्थी 2022: गणपतीला आवडणारे 5 पदार्थ

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version