कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आली नवी खुशखबर; गणेशोत्सव निमित्त सोडणार ‘या’ विशेष ट्रेन

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आली नवी खुशखबर; गणेशोत्सव निमित्त सोडणार ‘या’ विशेष ट्रेन

गणेशउत्सव म्हंटल की गावी जाण्याची ओढ काही केल्या थांबू शकत नाही. त्यातही जर कोकणातले गणपती म्हंटल तर लालामातीत कोरलेली शाडूची गणपती बाप्पाची मूर्ती समोर येते. कोकणातील सर्वात जास्त प्रसिद्ध सणांपैकी एक म्हणजे हा गणेशउत्सव सण होय. कोकणातील जे चाकरमानी आहेत ते सुट्टी असो वा नसो गणपतीला कोकणात गेले नाहीत असं होत नाही. या उत्सवाची सर्व प्रकर्षाने वाट पाहत असतात. कितीतरी महिन्यांआधी पासूनच चाकरमानी कोकणात जाण्यासाठी सीट्स बुक करत असतात. त्यातच आता एक नवी खुश खबर आली आहे. ती म्हणजे गणेशउत्सवानिमित्त आता या ट्रेन चे वेळापत्रक ठरवण्यात आले आहे.  ते आपण जाणून घेऊयात.

  1. स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या) पर्यंत दररोज रात्री १२:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी ०२:२० वाजता सावंतवाड़ी येथे पोहोचेल.
  2. ०११५२ स्पेशल सावंतवाडीवरून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या) दररोज ०३.१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०४.३५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.
  3. या रेल्वेचे थांबे कुठे असतील :
    दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावड, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.
  1. स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या) पर्यंत दररोज सकाळी ११:३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ०८:१० वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल.
  2. ०११५४ स्पेशल रत्नागिरीवरून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या) दररोज पहाटे ४ वाजता सुटेल आणी त्याच दिवशी दुपारी ०१:३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.
  3. थांबे: दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावडाव, आरवली रोड, संगमेश्वर रोड रचना: १२ स्लीपर क्लास, ०४ जनरल, २ थ्री टायर एसी आणि  २ एसएलआर असे मिळून एकूण २० डबे
  1. लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या) पर्यंत दररोज रात्री २१:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०९:३० वाजता कुडाळ येथे पोहोचेल.
  2. ०११६८ स्पेशल कुडाळवरून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या) दररोज दुपारी १२:०० वाजता सुटेल आण ि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ००:४० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.
  3. थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, अंजनी, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग
  4. रचना: १२ स्लीपर क्लास, ०४ जनरल, २ श्री टायर एसी आणि  २ एसएलआर असे मिळून एकूण २० डबे
  1. स्पेशल एलटीटी मुंबई येथून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या) पर्यंत दररोज सकाळी ०८:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ०९:०० वाजता सावंतवाडी येथे थांबेल.
  2. ०११७२ स्पेशल सावंतवाडीवरून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या) पर्यंत दररोज रात्री १०:२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०:४० वाजता एलटीटी मुंबई येथे पोहोचेल.
  3. थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग.
    रचना: १२ स्लीपर क्लास, ०४ जनरल, २ थ्री टायर एसी आणि २ एसएलआर असे मिळून एकूण २० डबे
  1. मेमू स्पेशल दिवा येथून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या) पर्यंत दररोज सकाळी ०७:१५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १४:०० वाजता चिपळूण येथे पोहोचेल.
  2. ०११५६ मेमू स्पेशल चिपळूणवरून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या) पर्यंत दररोज दुपारी १५:३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २२:५० वाजता दिवा येथे पोहोचेल.
  3. थांबे: दिवा, निळजे, तळोजा, कळंबोली, पनवेल, सोमाटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेन, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गारगाव, सोपे वामने, करंजाडी, विन्हेरे, कळंबणी, खेड, अंजनी
  1. लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून ०२.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (८ फेऱ्या) पर्यंत सोमवार, बुधवार आणि शनिवारी रात्री ००:४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी १२:३० वाजता कुडाळ येथे पोहोचेल.
  2. ०११८६ स्पेशल कुडाळवरून ०२.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या) सोमवार, बुधवार आणि शनिवारी संध्याकाळी १६:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ०४:५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.
  3. थांबे : ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग
    रचना: १२ स्लीपर क्लास, ०४ जनरल, २ श्री टायर एसी आणि २ एसएलआर असे मिळून एकूण २० डबे
  1. लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून ०३.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (3 फेऱ्या) पर्यंत मंगळवारी रात्री ००:४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी १२:३० वाजता कुडाळ येथे पोहोचेल.
  2. ०११६६ स्पेशल कुडाळवरून ०३.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (3 फेऱ्या) पर्यंत मंगळवारी संध्याकाळी १६:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ०४:५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.
  3. थांबे : ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग रचना: १२ स्लीपर क्लास, ०४ जनरल, २ श्री टायर एसी आणि २ एसएलआर असे मिळून एकूण २० डब्बे

हे ही वाचा:

घटस्फोटाची घोषणा करत HARDIK PANDYA यांनी केले चाहत्यांना आवाहन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version