PUNE: “पुढच्या वर्षी लवकर या !” मानाच्या पाचही गणपतींच्या विसर्जन मिरवणुकींना सुरुवात

PUNE: “पुढच्या वर्षी लवकर या !” मानाच्या पाचही गणपतींच्या विसर्जन मिरवणुकींना सुरुवात

Pune Ganesh Visarjan 2024: आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे १० दिवसांच्या पाहुणचारानंतर आज (बुधवार, १७ सप्टेंबर) रोजी विसर्जन होणार आहे. पुण्यामध्ये घरगुती गणपतीसोबतच पाच मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकींना सुरुवात झाली असून मोठया थाटामाटात, ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली आहे. पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपती, मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती, मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम, मानाचा चौथा तुळशीबाग गणपती आणि मानाचा पाचवा केसरीवाड्याचा गणपती या पाचही मानाच्या गणपतींची मोठ्या धुमधडाक्यात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.

पुण्यातील मानाचा पहिला गणपती कसबा गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

पुण्यातील पहिला मानाचा गंपाती म्हणून कसबा गणपती ओळखला जातो. कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली असून कसबा गणपतीसमोर बेलबाग चौकातील रमणबाग ढोलताशा पथकाचे वादन पार पडले आहे. मानाच्या पहिल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून येत आहे.

मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळाची श्रींची मिरवणूक चांदीच्या पालखीतून निघाली आहे. या विसर्जन मिरवणुकीमध्ये पारंपरिक पोशाखात कार्यकर्ते सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय. या विसर्जन मिरवणुकीचे मेन वैशिष्ट्य म्हणजे सतीश आढाव यांचे नगारा वादन, न्यू गंधर्व ब्रास बँन्ड, समर्थ प्रतिष्ठान, ताल, शिवमुद्रा ढोल-ताशा पथके असणार आहेत विष्णूनादचे कार्यकर्त्यांनी पालखीपुढे शंख नाद केल्याचं पाहायला मिळाला.यंदा शिवराज्याभिषेक रथातून मानाच्या दुसऱ्या गणपतीची मिरवणूक निघाली आहे.

मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

मानाचा तिसरा – गुरुजी तालीम मंडळाचा गणपती यंदा आकर्षक फुलांच्या सूर्यरथात रथातुन गणपती बाप्पाची निघाली आहे. यंदा पालखीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे जयंत नगरकर यांचे नगारावादन, अश्वराज ब्रास बँन्ड आहे. तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक शाळा (फुलगांव) प्रात्यक्षिके सादर करतील. नादब्रह्म, नादब्रह्म ट्रस्ट, गर्जना ढोलताशा पथके असणार आहेत यंदा विशेष बाब म्हणजे राज्यात प्रथमच सुरू झालेलं तृतीय पंथीयांचं शिखंडी पथक आपलं वादन या विसर्जन मिरवणुकीत वादन करत करत आहे.

मानाचा चौथा तुळशीबाग गणपती मंडळातील बाप्पाची मिरवणूक सुरु

मानाचा चौथा – तुळशीबाग गणपती मंडळातील बाप्पाची मिरवणूक जगन्नाथ पूरी रथातून निघाली आहे. मिरवणुकीत लोणकर बंधूंचा नगारा, स्व-रूपवर्धिनी, गजलक्ष्मी ही ढोलताशा पथक सहभागी होणार आहेत. स्वरूपवर्धिनीचे विद्यार्थी मल्लखांबाचे प्रात्यक्षिक सादर केली.

मानाचा पाचवा केसरीवाड्याचा गणपतीची रथातून निघाली मिरवणूक

मानाचा पाचवा केसरीवाड्याचा गणपती मंडळाची लाकडी पालखीत श्रींची मूर्ती विराजमान झाल्यावर रथातून मिरवणूक निघाली . बिडवे बंधूंचा नगारा, शिवमुद्रा, श्रीराम आणि आवर्तन ढोल-ताशा पथके हे विसर्जन मिरवणूकीचे मुख्य आकर्षण आहे. विठ्ठलाची भव्य मूर्ती असलेला माऊली रथ मिरवणुकीचे आकर्षण आहे. यंदा विशेष बाब म्हणजे इतिहास अभ्यासक मोहन शेटे हे लोकमान्य टिळक यांच्या वेशभूषेत आहेत.

Exit mobile version