spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... अशा नामगजरात आज बाप्पाचे विसर्जन केलं जात आहे. मुंबईत लालबाग, परळ परिसरात अनेक मोठी गणेशोत्सव मंडळ आहेत.

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… अशा नामगजरात आज बाप्पाचे विसर्जन केलं जात आहे. मुंबईत लालबाग, परळ परिसरात अनेक मोठी गणेशोत्सव मंडळ आहेत. लालबागचा राजा, मुंबईचा राजा, गिरगावचा राजा, खेतवाडी, चिंतामणी अशा सर्व गणपतींची आज भव्य विसर्जन मिरवणुका निघण्यास सुरवात झाली आहे. नुकताच लालबागचा राजा हा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. लालबागच्या राजाच्या विसर्जन मुरवणुकीला सुरुवात झाली आहे.

लालबागमध्ये सर्वात आधी मुंबईचा राजा अर्थात गणेशगल्लीचा गणपती मंडळाचा मान पहिला असतो. सर्वप्रथम मुंबईचा राजा विसर्जन मिरवणूकीसाठी बाहेर काढला जातो. त्यानंतर इतर गणेशोत्सव मंडळांचे गणपती विसर्जनासाठी बाहेर काढले जातात. मुंबईमधील गणेशगल्लीचा राज्याची विसर्जन मिरवणूक हि सुरु झाली आहे. गणपतीला बाहेर काढण्यात देखील आले आहे. त्यापाठोपाठ तेजुकायाचा गणपती देखील विसर्जनाच्या मार्गाने मार्गस्थ झाला आणि आणि चिंचपोळीकळीच्या चिंतामणीची देखील भव्य विसर्जन मिरवणूक हि सुरु झाली आहे. आणि त्यापाठोपाठ आता लालबागचा राज्याची देखील विसर्जन मिरवणूक हि सुरु झाली आहे.

आज अनंत चतुर्दशी आहे. दहा दिवसांनी लाडक्या बाप्पाला निरोप द्यावा लागणार आहे. आज दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन सर्वांचा लाडका बाप्पा भक्तांचा निरोप घेणार आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हटलं जाते. श्री गणेश चतुर्थीला बाप्पा विराजमान झाल्यानंतर दहा दिवस लाडक्या गणेशाची पूजा अर्चना केली जाते. त्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जातं. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… अशा नामगजरात आज बाप्पाचं विसर्जन केलं जाईल. राज्यभरात आज दहा दिवसांच्या गणपती बाप्पाला निरोप दिला जाईल.

हे ही वाचा :

अजित पवार पत्नी सह श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला

बाप्पा निघाले गावाला, चैन पडेना आम्हाला… ! दहा दिवसांनी लाडक्या बाप्पाला निरोप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss