spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

उद्या गणेश विसर्जनासाठी राज्यभर कडक बंदोबस्त

उद्या संपूर्ण राज्यात १० दिवसांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन होणार आहे. राज्यातील गणेश विसर्जनाची तयारी पूर्ण झाली असून मुंबईसह राज्यातील प्रमुख ठिकाणी पोलीस आणि प्रशासन सज्ज झाले आहेत.

उद्या संपूर्ण राज्यात १० दिवसांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन होणार आहे. राज्यातील गणेश विसर्जनाची तयारी पूर्ण झाली असून मुंबईसह राज्यातील प्रमुख ठिकाणी पोलीस आणि प्रशासन सज्ज झाले आहेत. तसेच प्रत्येक ठिकाणी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबईमध्ये १५,५०० पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहेत. तसेच राज्यातील इतर भागातही कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. दोन वर्षानंतर पहिल्यांदाच गणेश विसर्जनाचा कार्यक्रम होणार असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला आहे.

मुंबईत गणेश विसर्जनासाठी साडे पंधरा हजार पोलीस आणि SRPF च्या तुकड्या तैनात असणार आहेत. रॅपिड अँक्शन फोर्सची टीम तसेच फोर्स वनची विशेष टीम सुद्धा तैनात असणार आहेत. ६०० पोलीस महिला अधिकारी कर्मचारी हे साध्या वेशात मुंबईच्या महत्त्वाच्या विसर्जन स्थळाच्या ठिकाणी तैनात असणार आहेत, तर मुंबईतील ७७ महत्त्वाचे विसर्जन स्थळ आणि कृत्रिम तलाव येथे विशेष पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहेत. क्राईम ब्रान्च आणि एटीएस अधिकारी सुद्धा विसर्जनाच्या दिवशी विशेष बंदोबस्तावर आहेत.

तसेच मुंबई सह राज्यातील इतर भागांमध्ये म्हणजेच नागपूर, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, उस्मानाबाद अश्या राज्यात देखील पोलिसांचा बंदोबस्त का उद्या असणार असणार आहे. उस्मानाबादमध्ये गणेश विसर्जनासाठी विहीर आणि हातलाई तलाव परिसर स्वच्छ करून त्या भोवती बॅरॅकेट्स लाईटची व्यवस्था सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने नगरपालिका यांच्याकडून दक्षता घेण्यात आले आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाकडूनही शहरातून पथसंचलन करून १८० लोकांचा बंदोबस्त या परिसरात लावण्यात आला आहे.

तर नाशिकमध्ये गणेशोत्सवाच्या मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गासह नाशिकरोड, गंगापूर सातपुर, सिडको या भागातील विसर्जन स्थळांजवळील वाहतूक मार्गात सुद्धा बदल करण्यात आले आहेत. यासह नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या सिटीलिंगच्या बसेसचाही मार्ग बदलवण्यात आला आहे. यंदा प्रथमच मिरवणूक सकाळी अकरा वाजता सुरू होणार असून यामुळे सकाळी दहा वाजेपासूनच मिरवणूक मार्गासह उपनगरीय भागातील मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार बंदोबस्तांची आखणी करण्यात आली असून मिरवणूक मार्ग लगत कोठेही कोणीही हातगाडी, सायकल मोटरसायकल किंवा कुठलेही वाहने उभे करणार नाही. या मार्गावर केवळ मिरवणुकीत सहभागी मंडळांच्याच वाहनांना प्रवेश असणार आहे.

औरंगाबादमध्ये देखील दैनंदिन वाहतूक काही मार्ग बंद करून पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात येणार आहे. सकाळी ७ ते रात्री गणेश विसर्जनापर्यंत वाहतुकीत केलेले बदल कायम असणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तर पुणे शहरात ५ हजार पोलीस तैनात असणार आहेत. यंदा तीन हजार सार्वजनिक गणेश मंडळाच विसर्जन होण्याचां अंदाज आहे. पुण्यात 85 ठिकाणी घाटावर गणपती विसर्जन होणार आहे. आज रात्री पासून हा पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे. लवकरात लवकर विसर्जन मिरवणूक संपवण्यासाठी पुणे पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येणार आहे. लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्त्यावर मुख्य विसर्जन मिरवणूक असणार आहे. तर उद्या पुण्यातील प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी असणार बंद असणार आहेत.

नागपुरात देखील गणरायाला विसर्जनाच्या दृष्टीने प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज आहे. शहरातल्या फुटाळा, सोनेगाव, सक्करदरा, शुक्रवारी अशा विविध तलावात विसर्जनाला मनाई आहे. त्यामुळे नागपूर महापालिकेने ठिकठिकाणी ३९० कृत्रिम तलाव (टॅंक) कुंड विसर्जनासाठी तयार केले आहे. तसेच राज्यातील इतर भागांमध्ये देखील विसर्जनाची तयारी हि मोठ्या प्रमाणात करण्यात आली.

हे ही वाचा:

सेंट्रल व्हिस्टा उद्घाटन: एव्हेन्यूला मिळणार ६०८ कोटींचा नवा अवतार, जाणून घ्या पंतप्रधान मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टबद्दल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss