‘पोलीस बाप्पा’ गाणं भन्नाट वायरल, फडणवीसांनी केले शेअर

काल म्हणजेच दि. ३१ ऑगस्ट २०२२ रोजी महाराष्ट्रातील घराघरामध्ये गणरायाचे आगमन झाले. भक्तिभावाने आणि उत्साहात बाप्पाचे स्वागत हे करण्यात आले.

‘पोलीस बाप्पा’ गाणं भन्नाट वायरल, फडणवीसांनी केले शेअर

काल म्हणजेच दि. ३१ ऑगस्ट २०२२ रोजी महाराष्ट्रातील घराघरामध्ये गणरायाचे आगमन झाले. भक्तिभावाने आणि उत्साहात बाप्पाचे स्वागत हे करण्यात आले. घरोघरी आरती आणि भजनांचा आवाज घुमू लागला. परंतु या सर्व सणांमध्ये पोलीस हे नेहमी कार्यरत असतात परंतु अशातच मुंबईतील विलेपार्ले पोलीस स्टेशनमध्येही ( Vileparle Police Station ) बाप्पाचे आगमन झाले. मुंबई पोलिसांनी यंदा गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘पोलीस बाप्पाचे’ ( Police Bappa ) स्वागत केले.

हे ही वाचा :- दीड दिवसांच्या बाप्पाच्या निरोपासाठी मुंबई पालिकेकडून तयारी पूर्ण

सायबर गुन्हे आणि फसवणुकीबाबत लोकांना जागृत करणारे गाणे मुंबई पोलिसांकडून रिलीज करण्यात आले आहे. या गाण्याचा व्हिडीओ राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ( State Home Minister Devendra Fadnavis ) यांनी आपल्या ट्विटर ( Twitter ) अकाऊंटवरून शेअर केला आहे. नागरिकांनी वेळीच सावध व्हावे आणि सायबर फसवणुकीपासून स्वतःचे कसे रक्षण करावे यासंबंधी माहिती या गाण्यातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

पोलीस ठाण्याचे इन्स्पेक्टर राजेंद्र काणे ( Rajendra Kane ) यांनी सांगितले की ‘पोलीस बाप्पा’ आणण्यामागचा हेतू लोकांमध्ये सायबर गुन्ह्यांबद्दल जागरूकता पसरवणे हा आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने गुन्हेगारी, वाहतूक नियम आणि विशेषत: सायबर फसवणुकीबाबत माहिती नसलेल्या लोकांना जागरुक करण्यात येत आहे. यासाठी त्यांनी स्वतः एक गाणेही तयार केले असून या गाण्याचे शीर्षक ‘पोलीस बाप्पा’ असे आहे. पोलीस इन्स्पेक्टर काणे यांच्या संकल्पनेतून तयार झालेले हे गाणे प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत ( Singer Vaishali Samant ) आणि गायक अवधूत गुप्ते ( Singer Avadhoot Gupte ) यांनी गायले आहे. तसेच या गाण्यामध्ये अभिनेता पुष्कर श्रोत्री, ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर, चिन्मयी सुर्वे, जयवंत वाडकर, माधव देवचके आणि हृषिकेश जोशी यांनी अभिनय केला आहे.

हे ही वाचा:

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतले सहपरिवार मुंबईच्या राजाचे दर्शन

प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रांनी गणेशोत्सवानिमित्ताने शेअर केलेला व्हिडिओ नक्कीच पहा

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version