spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

टाईम महाराष्ट्र आयोजित “इकोफ्रेंडली सुंदर माझा बाप्पा!” गणेशोत्सव स्पर्धा २०२४

यंदाच्या वर्षी गणेशोत्सव काहीसा रंजक बनवण्यासाठी ‘टाईम महाराष्ट्र’ घेऊन आला आहे ‘इकोफ्रेंडली सुंदर माझा बाप्पा’ गणेशोत्सव स्पर्धा २०२४.

यंदाच्या वर्षी गणेशोत्सव काहीसा रंजक बनवण्यासाठी ‘टाईम महाराष्ट्र’ घेऊन आला आहे ‘इकोफ्रेंडली सुंदर माझा बाप्पा’ गणेशोत्सव स्पर्धा २०२४. यंदाच्या वर्षी पर्यावरण संरक्षणाचे सूत्र पकडत गणेशोत्सव पर्यावरण पूरक करायचाय त्यासाठी ‘टाईम महाराष्ट्र’ ने यंदा ‘इकोफ्रेंडली सुंदर माझा बाप्पा’ गणेशोत्सव २०२४ स्पर्धेचं आयोजन केलं आहे.

जर तुम्ही देखील तुमच्या घरी किंवा सार्वजनिक गणेश मंडळात ‘इको फ्रेंडली गणपती बाप्पाचा उत्सव’ साजरा करत असाल, त्यात इको फ्रेंडली असे डेकोरेशन (सजावट) करत असाल तर या स्पर्धेच्या माध्यमातून तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. तुम्ही तुमच्या गणपती बाप्पाचे आणि सजावटीचे काही व्हिडिओ आणि फोटो शेअर करत, खालील दिलेल्या नियमांचे पालन करून या स्पर्धेत सहज सहभागी होऊ शकता. स्पर्धेचे नियम अगदी सोपे आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपला गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित व्हावा आणि पर्यावरणाची काळजी घेत सामाजिक भान जपलं जावं हाच आमचा उद्देश आहे. या स्पर्धेसाठी कोणीही बनावट, जुने फोटो किंवा इतरांचे फोटो पाठवू नयेत. तुम्हाला या स्पर्धेत सहभागी व्हायचे असेल तर पुढील माहिती सविस्तर वाचा.

तुमच्या गणपती बाप्पाचा ३० ते ६० सेकंदचा व्हिडिओ हा timemaharashtra या इंस्टाग्राम अकाउंटला कोलॅब्रेशन करा. आमच्या अकाउंटला कोलॅब्रेशन करणे अनिवार्य आहे. फोटो काढताना मोबाईल आडवा धरून शूट करावे. व्हिडिओ शूट करताना तो व्यवस्थित शूट होईल याची काळजी घ्यावी. तसेच या स्पर्धेसाठी आवश्यक असणारा फॉर्म पूर्ण भरणे अनिवार्य आहे.

Instagram – https://www.instagram.com/timemaharashtra

ही सर्व माहिती आम्हाला खाली दिलेल्या लिंकद्वारे फॉर्म भरून पाठवा : Link –

Form link:  https://www.timemaharashtra.com/ganeshotsav-competition-2024

“सुंदर माझा बाप्पा!” गणेशोत्सव स्पर्धा २०२४ साठी नोंदणी पूर्णपणे मोफत आहे. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

“सुंदर माझा बाप्पा!” गणेशोत्सव स्पर्धा २०२४ स्पर्धेची बक्षीसे

प्रथम पारितोषिक – रोख रक्कम ७००० /- + ट्रॉफी
द्वितीय पारितोषिक – रोख रक्कम ५०००+ ट्रॉफी
तृतीय पारितोषिक – रोख रक्कम ३०००/- + ट्रॉफी
यंदा स्पर्धेसाठी प्रत्येकी १०००/- रुपयांची चार उत्तेजनार्थ बक्षिसे आहेत.

स्पर्धेसाठी तज्ञ आणि अनुभवी परीक्षकांचे एक पॅनेल आहे. ज्यात मूर्तीकार, चित्रकार, नेपथ्यकार, पर्यावरण तज्ञ यांचा समावेश आहे. जे बहुविध निकषांच्या आधारे पारितोषिक विजेत्यांचा निर्णय देतील आणि त्यांचा निर्णय अंतिम मानला जाईल.

स्पर्धेच्या तारखा :

  • गणपती स्पर्धा ०७ सप्टेंबर २०२४ (शनिवार) रोजी सुरू होईल.
  • सहभागी होण्याची आणि व्हिडिओ आणि संपूर्ण माहिती सबमिट करण्याची शेवटची तारीख १९ सप्टेंबर २०२४ (गुरुवार)आहे.
  • घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच ०३ ऑक्टोबर २०२४ रोजी टाईम महाराष्ट्र च्या वेबसाईटवर विजेत्यांची नावे घोषित केली जातील.
  • एकदा निकाल घोषित झाल्यानंतर प्रत्येक सहभागींना ईमेलद्वारे सूचित केले जाईल आणि टाईम महाराष्ट्र या वेबसाईट वर देखील निकाल जाहीर केला जाईल.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा : Time Maharashtra

Email id – [email protected]

Whats app No – 9769612336

हे ही वाचा:

कोण होणार Mahavikas Aghadi चा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? Sharad Pawar यांचे मोठे वक्तव्य

Aaditya Thackeray तुम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलात, तुम्हाला शेती माहित नाही: Dhananjay Munde

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss