गणेश चतुर्थीच्यावेळी उकडीचे मोदक का खावेत?

कारण मोदक हा एक पदार्थ नसून भारतीय इतिहासात त्याला आयुर्वेदाच्या दृष्टीने देखील खूप महत्तव दिले गेले आहे.

गणेश चतुर्थीच्यावेळी उकडीचे मोदक का खावेत?

गूळ आणि खोबऱ्याचे सारण आणि तांदळाच्या पिठाला एकत्र करून केला जाणारा पदार्थ म्हणजे मोदक. गणपतीला आवडतो म्हणून गणेशोत्सव साजरा होणाऱ्या प्रत्येक घरात आवर्जून उकडीचे मोदक केले जातात. पण, हल्लीच्या काळात उकडीच्या मोदकांशिवाय काजू मोदक, माव्याचे मोदक आणि अगदी चॉकलेट मोदकदेखील तयार केले जातात. जरी इतक्या प्रकारचे मोदक असले तरी उकडीचे मोदक खाणे कधीही उत्तम. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि उकडीचेच मोदक का खावेत जर आपण इतक्या प्रकारचे मोदक खाऊ शकतो. कारण मोदक हा एक पदार्थ नसून भारतीय इतिहासात त्याला आयुर्वेदाच्या दृष्टीने देखील खूप महत्तव दिले गेले आहे.

  1. मोदकामुळे बधकोष्ठता म्हणजे constipation दूर होते

आता ते कसे तर, मोदक हा गूळ आणि खोबऱ्याचे समृद्ध असलेला पदार्थ आहे. मोदकातील तूप हे आतड्यांतील श्लेमाचे अस्तर intestinal mucus lining पुन्हा तयार करण्यास मदत करते तसेच आतद्यांमधील विषारी पदार्थ बाहेर टाकून पोट साफ करण्यास मदत करते.

2. रोगप्रतकारकशक्ती वाढवतात

मोदकामधील गूळ हे लोह आणि फोलोटने परिपूर्ण आहे. ज्यामुळे शरीरातील लाल पेशी वाढवण्यास मदत होते. तसेच गूळ हे जीवनसत्वे, खनिजे आणि सॅचुरेटेड फॅटने समृद्ध असते, ज्यामुळे शरीरातील विषाणू, किटाणुंशी लढण्यास मदत होते.

3. हृदयाचे रक्षण करतात.

नारळ आणि तुपात मध्यम – साखळी ट्रायग्लीसराइड्स असतात ज्यामुळे शरीरातील गूड कॉलेस्ट्रोल वाढते, शरीरातील चयापचय वाढते आणि त्याचबरोबर रक्तदाबही नियंत्रणात राहतो.

4. मधुमेहींसाठीचा गोड पदार्थ

गूळ, खोबरे, तूप आणि तांदूळ वाफवून म्हणजेच त्याचे मोदक करून खाल्ल्यास शरीरातली साखर वाढत नाही. ती स्थिर राहते कारण मोदकातील ग्लायकेमिस इंडेक्स मध्यम ते कमी या प्रमाणात असते.

5. थायरॉईड नियंत्रित करते

गूळ, तूप, खोबरे आणि तांदूळ हे थायरॉईड ग्रंथिंसाठी खूप महत्त्वाचे असतात. मोदकातील मध्यम ते कमी प्रमाणातील ग्लायकेमिस इंडेक्स, गूड कॉलेस्ट्रोलमुळे थायरॉईड नियंत्रित होण्यास मदत होते.

हे ही वाचा:

भाजपमध्ये प्रवेश करणार का प्रवेश? राजकीय चर्चांना अशोक चव्हाणांनी दिली पहिली प्रतिक्रिया

गौरीपूजनास महालक्ष्मी पूजन देखील म्हणतात, जाणून घ्या गौरी आगमनाबद्दल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version