spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

गणपतीला दुर्वा का वाहावी ? माहित नसे तर नक्की वाचा

सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. भाद्रपद मासातील शुक्ल पक्ष चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थीला गणराज अनेकांच्या घरोघरी आगमन करतात

सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. भाद्रपद मासातील शुक्ल पक्ष चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थीला गणराज अनेकांच्या घरोघरी आगमन करतात आणि त्याचसोबत सार्वजनिक ठिकाणी देखील बाप्पाना विराजमान केले जाते. यंदा ३१ ऑगस्ट रोजी बाप्पा भक्तांच्या भेटीला येणार आहेत. दरवर्षी गणपती

यावर्षी ३१ ऑगस्ट रोजी बाप्पा भक्तांच्या भेटीला येणार आहेत. योगायोग म्हणजे यंदा बुधवारी बाप्पांचे आगमन होणार आहे, हिंदू मान्यतांनुसार बुधवार हा गणेशाच्या उपासनेचा वार म्हणून ओळखला जातो. दरवर्षी गणेशोत्सवाच्या तयारीत दुर्वांना महत्त्वाचं स्थान असतं. गणरायाच्या मूर्तीला २१ दुर्वांची जुडी अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते पण तुम्हाला यामागचे खरे कारण माहीत आहे का ?

गणपतीच्या मूर्तीची पूजा करताना सहसा सर्व गोष्टी या चरणाशी अर्पण केल्या जातात मात्र दुर्वा वाहताना त्या बाप्पाच्या मस्तकावर ठेवल्या जातात यामागे एक आख्यायिका आहे. अनलासूर नावाच्या राक्षसाने ऋषी मुनी आणि देवता यांना त्रास द्यायला सुरुवात केली होती. अनल अर्थात अग्नी. देवतांच्या विनंतीनंतर गणपतीने त्या असूराला गिळून टाकले. यामुळे गणपतीच्या पोटात जळजळ होऊ लागली. गणरायाचा त्रास कमी व्हावा यासाठी अनेक ऋषीमुनींनी प्रयत्न केले मात्र कशानेच गणेशाच्या पोटातील दाह कमी होत नव्हता. तेव्हा ८८ सहस्त्र मुनींनी प्रत्येकी २१ अशा हिरव्यागार दुर्वांच्या जुड्या गणरायाच्या मस्तकावर ठेवल्या. कश्यप ऋषींनी दुर्वांच्या २१ जुडी गणेशाला खाण्यास दिल्या. दुर्वा खाल्ल्यावर गणेशाच्या पोटातली न थांबलेली जळजळ कमी झाली. यानंतर आनंदी होऊन यापुढे मला दुर्वा अर्पण करणाऱ्यास हजारो यज्ञ, व्रते, दान व तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल असे वरदान गणेशाने दिले होते. याच कारणाने दरवर्षी गणेशोत्सवात गणपतीला दुर्वा आवर्जून वाहिल्या जातात.

हे ही वाचा :-

जाणुन घ्या… बैलपोळा सणाची कहाणी

घरगुती आणि सोप्या पद्धतीने गणपती बाप्पासाठी सुंदर सजावट

 

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss