Gurupournima 2024: ‘गुरुपौर्णिमा’ कधी आहे जाणून घ्या सविस्तर माहिती

दरवर्षी आषाढ पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी गुरूंची पूजा केली जाते. तसेच अनेकजण या दिवशी व्यासमुनींसह श्रीविष्णूची देखील पूजा करतात. या गुरुपौर्णिमेची तिथी आणि शुभ मुहूर्त याची थोडक्यात माहिती करून घेऊया.

Gurupournima 2024: ‘गुरुपौर्णिमा’ कधी आहे जाणून घ्या सविस्तर माहिती

आषाढ महिना आला की सुरुवात होते ती मराठी सणांना. आषाढ महिन्यातील दुसरी आणि महत्वाची तिथी म्हणजे गुरुपौर्णिमेची. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा साजरी केली जाते. हिंदू धर्मानुसार गुरुपौर्णिमेला विशेष महत्व आहे. आपल्या गुरुप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी का दिवस साजरा केला जातो. हा दिवस महाभारताची रचना करणारे महर्षी वेद व्यास यांचा जन्मदिवस म्हणून ओळखला जातो. वेद व्यासांनी चारही वेदांच्या संबंधित ज्ञान प्राप्त करून त्याविषयी सांगितले. त्यांच्या महान योगदानामुळे दरवर्षी आषाढ पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी गुरूंची पूजा केली जाते. तसेच अनेकजण या दिवशी व्यासमुनींसह श्रीविष्णूची देखील पूजा करतात. या गुरुपौर्णिमेची तिथी आणि शुभ मुहूर्त याची थोडक्यात माहिती करून घेऊया.

गुरुपौर्णिमेची तिथी आणि शुभ मुहूर्त 

हिंदी पंचांगानुसार आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथी २० जुलै रोजी संध्याकाळी ५.५९ वाजता सुरु होईल आणि २१ जुलै रोजी दुपारी ३ वाजून ४७ मिनिटांनी संपेल. ज्योतिष शास्त्रानुसार पौर्णिमा तिथीचे व्रत चंद्रोदय दिवशी केले जाईल. त्यामुळे पौर्णिमेचे व्रत २० जुलैला करण्यात येईल तर २१ जुलैला गुरुपौर्णिमेच्या दिवशी दानधर्म करावा.

गुरुपौर्णिमेची पूजा कशी करावी 

गुरु पौर्णिमेच्या दिवशी ब्रम्ह मुहूर्ताला उठून स्मरण करावे. स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा. त्यानंतर देवघराची स्वच्छता करून व्यासजींची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करा. गुरूंना फुले, अक्षता, चंदन आणि हार अर्पण करा. भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि गुरूंची पूजा करून नैवेद्य अर्पण करा. तसेच गुरुपौर्णिमा व्रत कथेचे पठण करावे. तसेच शिक्षणासोबतच गुरु आपल्या शिष्यांना योग्य मार्गदर्शनही करतात. दुसरीकडे आपल्या गुरूचा आशीर्वाद घेणे खूप महत्वाचे आहे. म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु आणि ज्येष्ठांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घ्यावा.

 
 

Worli Hit and Run Case: गृहमंत्री Devendra Fadnavis ‘युजलेस’! महिलेचा आक्रोश तुमच्या कानापर्यंत पोहोचला नाही का?: Sanjay Raut

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version