Happy New Year 2023 तुमच्या गाण्यांच्या प्लेलिस्टमध्ये करा ‘या’ गाण्यांचा समावेश आणि शानदार पद्दतीने करा नव्या वर्षाचे स्वागत

आज आम्ही तुमच्यासाठी नवीन वर्षाचे सेलिब्रेशन द्विगुणित करणाऱ्या गाण्यांची प्लेलिस्ट घेऊन आलो आहोत. ही गाणी तुम्हाला नाचायला भाग पाडणारी आहेत.

Happy New  Year 2023 तुमच्या गाण्यांच्या प्लेलिस्टमध्ये करा ‘या’ गाण्यांचा समावेश आणि शानदार पद्दतीने करा नव्या वर्षाचे स्वागत

एकीकडे लोक २०२२ वर्षाचा निरोप घेणार आहेत, तर दुसरीकडे नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. २०२३ च्या सुरुवातीची तयारी अंतिम टप्प्यात आहे, पण संगीत किंवा गाण्यांशिवाय सर्व मजा कशी पूर्ण होईल? दरवर्षीप्रमाणे या वेळीही लोक ३१ डिसेंबरच्या रात्री पार्टी आणि सेलिब्रेशनमध्ये सामील होऊन वर्ष २०२२ ला निरोप देतील. आज आम्ही तुमच्यासाठी नवीन वर्षाचे सेलिब्रेशन द्विगुणित करणाऱ्या गाण्यांची प्लेलिस्ट घेऊन आलो आहोत. ही गाणी तुम्हाला नाचायला भाग पाडणारी आहेत.

काला चष्मा

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या ‘बार बार देखो’ चित्रपटातील ‘काला चष्मा’ हे गाणे आजही लोकांच्या ओठावर आहे. कोणत्याही प्रसंगी पार्टी असेल तर हे गाणे नक्कीच वाजवले जाते. हे गाणे पार्ट्या आणि सेलिब्रेशनचे आकर्षण वाढवते.

स्वॅग से स्वागत

बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान आणि कतरिना कैफचा सुपरहिट चित्रपट ‘टायगर जिंदा है’ मधील ‘स्वॅग से स्वागत’ गाण्याशिवाय पार्टी अपूर्ण आहे. या गाण्याने तुम्हीही नवीन वर्षाचे स्वागत करा. तुमचे कुटुंब आणि मित्रांसोबत हे गाणे गाऊन तुम्ही नवीन वर्षाचे मनापासून स्वागत करू शकता.

ठुमकेश्वरी

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि क्रिती सेनन यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘भेडिया’ या चित्रपटातील ‘ठुमकेश्वरी’ या गाण्याने लोकांमध्ये चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. पार्टीत आपण अनेकदा नवीन गाण्यांची वाट पाहतो. अशा परिस्थितीत हे गाणे तुमच्या पार्टीचे वातावरण आणखीनच प्रेक्षणीय बनवेल.

नदियों पार

बॉलीवूड अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री जान्हवी कपूरच्या ‘रुही’ या चित्रपटातील ‘नदियों पार’ गाणे पार्टीसाठी सर्वोत्कृष्ट गाण्यांच्या प्लेलिस्टमध्ये समाविष्ट करण्यासारखे एक गाणे आहे. जान्हवी कपूरच्या ‘नदियों पार’मधील डान्स मूव्ह्सने सर्वानाच मोहून टाकले होते. हे सगळ्यांना डान्स फ्लोअरवर डान्स करायला भाग पाडणाऱ्यातले आहे.

आंख मारे

चार वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या रणवीर सिंगच्या ‘सिम्बा’ चित्रपटातील ‘आंख मारे’ गाण्यानेही लोकांना चांगलीच भुरळ घातली होती . या गाण्याची मोहिनी आजतागायत कायम आहे. हे गाणे आजही पार्ट्यांमध्ये वाजवले जाते.

बेशरम रंग

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा आगामी चित्रपट ‘पठाण’च्या रिलीजची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे, मात्र चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच त्याच्या ‘बेशरम रंग’ या गाण्याने सगळीकडे धुमाकूळ घातला आहे. या गाण्यावरून वाद वाढत असला तरी सोशल मीडियावर हे गाणे सर्वांचेच आवडते आहे. या नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये हे गाणे पार्टीची चमक वाढवणार आहे.

स्लो मोशन

बॉलिवूडच्या दबंग खान म्हणजेच सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटातील ‘स्लो मोशन’ हे गाणे खूप खास मानले जाते. या वेळी नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये हे गाणे तुमच्या पार्टीला शान वाढवू शकेल.

हसन परचम

किंग खान म्हणजेच शाहरुख खानचा चार वर्षांपूर्वी आलेला ‘झिरो’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला, मात्र या चित्रपटातील ‘हुस्न परचम’ या गाण्याने सर्वांचीच मनं जिंकली. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये तुम्ही हे गाणे देखील समाविष्ट करू शकता.

टिप टिप बरसा पानी

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटातील ‘टिप टिप बरसा पानी’ आणि १९९४ मधील ‘मोहरा’ चित्रपटातील ‘टिप टिप बरसा पानी’ हे गाणे आजही सदाबहार हिट आहे. हे गाणे ऐकून लोकांची पावले आपोआपच डान्सफ्लोरकडे वळु लागतात.

हे ही वाचा:

Happy New Year 2023 कुटुंबासह घरी बनवा बार्बेक्यूच्या मदतीनं स्वादिष्ट पनीर टिक्का, पहा रेसिपी

New Year celebration साठी कोहली कुटुंब पोहोचलं दुबईला,अनुष्का विराटचे आणि वामिकाचे सुंदर फोटो आले समोर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version