हिंदूसह मुस्लिम बांधवदेखील करतात पाकिस्थानातीत ‘या’ देवीचा पूजा

हिंदूसह मुस्लिम बांधवदेखील करतात पाकिस्थानातीत ‘या’ देवीचा पूजा

अगदी थाटमाटात गणपती बाप्पाचे आगमन झाले, निरोप देतो आता आम्हा आज्ञा असावी असे म्हणत, बाप्पाचे विसर्जन देखील झाले. आता ओढ लागली ती स्त्रीशक्तीचा आराधनाची म्हणजेच नवरात्रीची. अवघ्या काही दिवसांनी घटस्थापना केली जाणार आहे. अशी आशा आहे कि ज्या पद्धतीत गणेशोत्सव साजरा केला त्याप्रकारे नवरात्र देखील साजरी करता येईल. महाराष्ट्रसह संपूर्ण देशभरात नवरात्र हा सण उत्साहात साजरा केला जातो. पण तुम्हाला माहित आहे ? भारतापुरता मर्यदातीत नसून पाकिस्थानात देखील शक्तिपीठाचे अस्तित्व आहे. भारतातील माता वैष्णो देवीप्रमाणे पाकिस्तानातिल एका गुहेत हि देवी विराजमान आहे. या मंदिराविषयी अनेक कथा प्रचलित आहेत. तर जाणून घ्या पाकिस्थानातील देवीची अख्यायिका.

भारतासह पाकिस्तानातही शक्तीपीठ अस्तित्वात आहे. पाकमधील हे शक्तीपीठ वैष्णो देवी नावाने प्रसिद्ध आहे. पाकिस्थानातील हिंगोल नदीच्या किनारी हिंगलाज देवीचे एक मंदिर असून, देवीच्या ५१ पीठांपैकी एक असल्याचे सांगितले जाते. शास्त्रांतील मान्यतेनुसार, देवी सतीचे शीर या ठिकाणी येऊन पडले होते. देवीच्या या मंदिराला हिंगुला आणि नानी मंदिर किंवा नानी हज असेही म्हटले जाते.

हेही वाचा : 

मुख्यमंत्र्यांनी राजकारणापेक्षा प्रशासनाकडे लक्ष द्यावे ; आदित्य ठाकरेंचा टोला

भारतातील माता वैष्णो देवीप्रमाणे देवीचे या मंदिरातील देवीही एका गुहेत विराजमान आहे. या मंदिराविषयी अनेक कथा प्रचलित आहेत असून, या मंदिराला सुमारे २ हजार वर्षांचा इतिहास असल्याचे म्हटले जाते. केवळ हिंदू नाही, तर मुस्लिम बांधवही या मंदिरात सेवा करण्यासाठी येतात, असे सांगितले जाते.

हिंगलाज देवीचा महिमा मोठा असल्याचे सांगितले जाते. नवरात्रातील संपूर्ण नऊ दिवस हिंगलाज देवीच्या मंदिरात केवळ पाकिस्तानातून नाही, तर भारत आणि अन्य देशातील भाविकही दर्शन घेण्यासाठी एकत्रितपणे जातात. भाविकांचे गाऱ्हाणे देवी ऐकते. हिंगलाज देवीचरणी नतमस्तक झाल्यानंतर भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

धार्मिक मान्यतांनुसार, हिंगलाज देवीच्या चरणी नतमस्तक झालेल्यांना पूर्वजन्माच्या कष्टातून मुक्तता मिळते, असे सांगितले जाते. एका उंच पर्वतावर असलेल्या एका गुहेत हिंगलाज देवीचा दरबार भरतो. या मंदिर परिसरात कालिका माता, गणपती यांच्याही मूर्ती आहेत. तसेच महादेव शिवशंकर भीमलोचन स्वरुपात येथे प्रतिष्ठित आहेत, असे मानले जाते. बलुचिस्तानातील मुस्लिम समुदायात या देवीला नानी देवी म्हटले जाते.

Raju Srivastava : विनोदाचा बादशहा हरपला, राजू श्रीवास्तवबद्दल काही खास किस्से…

हिंगलाज देवीचा महिमा मोठा असल्याचे सांगितले जाते. नवरात्रातील संपूर्ण नऊ दिवस हिंगलाज देवीच्या मंदिरात केवळ पाकिस्तानातून नाही, तर भारत आणि अन्य देशातील भाविकही दर्शन घेण्यासाठी एकत्रितपणे जातात. भाविकांचे गाऱ्हाणे देवी ऐकते. हिंगलाज देवीचरणी नतमस्तक झाल्यानंतर भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. गुरुनानक देव, दादा मखान आणि गुरु गोरखनाथ यांनीही या मंदिरात येऊन हिंगलाज देवीचे दर्शन घेतल्याचे सांगितले जाते. इतकेच नव्हे तर भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांनीही या मंदिराला भेट दिल्याचे म्हटले जाते.

हिंगोलीमध्ये शेतकरी आक्रमक, रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध

Exit mobile version