spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Navratri 2022 : नवरात्रीच्या उपवासांमध्ये करा ‘या’ फळांचा समावेश

आज शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. नवरात्रीच्या उपवासामध्ये फळांचा समावेश करणे उपयुक्त ठरू शकते. नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीची पूजा केली जाते . आणि ९ माळा पूर्ण केल्या जातात . विविधप्रकारचे प्रसाद देवीला दाखवले जातात . देवीच्या समोर नऊ दिवस देवीचे पुराण वाचले जातात त्यामुळे वातावरण प्रसन्न होते . नवरात्रीमध्ये काहीजण नऊ दिवस निर्जय उपवास करतात . पणयामध्ये आरोग्याची काळजी देखील घेतली पाहिजे . काहीजण नवरात्रीमध्ये भक्तिभावाने पूजा आर्चना करतात आणि नंतर शरीराला थकवा जाणवतो. तसेच आपण नवरात्रीमध्ये उपवासाचे वेगवेगळे पदार्थ देखील बनवून खातो पण काहीजण त्या पदार्थासोबत फळांचा समावेश करत नाही फळांचा समावेश केला पाहिजे समावेश केल्यानी आरोग्याला चांगले फायदे मिळतात.

हे ही वाचा : Navratri 2022 : नवरात्रीमध्ये उपवास करताना “या” गोष्टी ठेवा लक्षात

 

नवरात्रीमध्ये ही फळे खाणे –

डाळिंब – रोज एकतरी डाळिंब खाणे डाळिंब खाल्याने शरीराला थकवा जाणवत नाही आणि रक्त देखील वाढते . तसेच तुम्ही डाळिंब सोबत डाळिंबाचे रस देखील पिऊ शकता.

सफरचंद – नवरात्रीच्या उपवासामध्ये रोज एक तरी सफरचंद खाले पाहिजे . सफरचंद खाल्याने मधुमेहाचा धोका कमी होतो . उपवासामध्ये रोज सकाळी सफरचंद खाले पाहिजे त्यामुळे अशक्त पणा जाणवत नाही .

संत्री – संत्री हे जीवनसत्वाचे आणि व्हिटॅमिन चे प्रतीक मानले जाते . संत्र्याचे सेवन केल्यास शरीर सुदृढ राहते . संत्र्यामध्ये फायबर आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असते . त्यासाठी उपवासामध्ये संत्री आवर्जून खाणे .

 

ब्लूबेरी – ब्लूबेरीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात. याशिवाय त्यात मिनरल्स भरपूर प्रमाणात असते. जर तुम्हाला उपवासात उत्साही राहायचे असेल तर तुमच्या आहारात ब्लूबेरीचा समावेश करा. तसेच, तुम्ही अनेक शारीरिक समस्यांपासून दूर राहाल.

केळी – उपवासामध्ये केळी खाणे केळी खाल्याने आरोग्यास उपयुक्त ठरते . केळ्यामध्ये पॉटेशिम आणि मिनरल्स या घटकांचे प्रमाण जास्त असते . आणि जर तुम्हाला हृदयविषयी काही समस्या असतील तर या दोन्ही घटकांमुळे दूर होतील त्यासाठी रोज केळी खाणे .

प्लम – प्लम खाल्ल्याने तुमचे शरीर हायड्रेटेड राहते. यासोबतच तुमच्या शरीराला भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स मिळतात. ज्यामुळे तुम्हाला शारीरिक कमजोरी जाणवत नाही. उपवासात शरीर निरोगी ठेवायचे असेल तर प्लम खा.

हे ही वाचा :

Navratri 2022 : दुर्गा मातेने अप्सरचे रूप धारण करून, केला महिषासुराचा वध

 

 

Latest Posts

Don't Miss