Karwa Chauth 2022 : सौभाग्याच्या रक्षणासाठी केले जाते ‘करवा चौथ’चे व्रत, जाणून घ्या

आपल्या सौभाग्याचे रक्षण करण्यासाठी महिला दरवर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला करवा चौथचे (Karwa Chauth 2022) व्रत करतात. यावर्षी करवा चौथचे व्रत १३ ऑक्टोबर २०२२ रोजी गुरुवारी केले जाणार आहे. असे मानले जाते की, या व्रताच्या प्रभावामुळे महिलांना अखंड सौभाग्याचे वरदान मिळते.

Karwa Chauth 2022 : सौभाग्याच्या रक्षणासाठी केले जाते ‘करवा चौथ’चे व्रत, जाणून घ्या

आपल्या सौभाग्याचे रक्षण करण्यासाठी महिला दरवर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला करवा चौथचे (Karwa Chauth 2022) व्रत करतात. यावर्षी करवा चौथचे व्रत १३ ऑक्टोबर २०२२ रोजी गुरुवारी केले जाणार आहे. असे मानले जाते की, या व्रताच्या प्रभावामुळे महिलांना अखंड सौभाग्याचे वरदान मिळते. करवा चौथला गणेशाची, शंकर-पार्वती, करवा माता याशिवाय चंद्राच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. सुखी वैवाहिक जीवनासाठी, पतीच्या संरक्षणासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी महिला या दिवशी निर्जल उपवास करतात. आणि चंद्राकडे पाहून उपवास सोडतात.

हे ही वाचा : Karwa Chauth 2022 : चित्रपटांमुळे आले ‘करवा चौथ’ व्रताला ग्लॅमर रूप… ‘या’ अभिनेत्री साजरा करणार पहिला ‘करवा चौथ’

यावर्षी करवा चौथ अनेक शुभ योगाने साजरी होणार आहे. यावेळी करवा चौथच्या दिवशी सिद्धी योगासह कृतिका आणि रोहिणी नक्षत्रही असतील. शास्त्रानुसार करवा चौथच्या दिवशी चंद्र वृषभ राशीत राहील. आणि या दिवशी रोहिणी नक्षत्र असणे अत्यंत शुभ मानले जाते. अशा वेळी या विशेष योगांमध्ये केलेली उपासना फार फलदायी असते असे मानले जाते.

कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्थीची सुरुवात : १३ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ०१:५९ वाजता
कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्थीचा शेवट : १४ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ०३:०८ वाजता

करवा चौथ 2022 मुहूर्त (Karwa Chauth Muhurtha 2022) :

करवा चौथ पूजा मुहूर्त : १३ ऑक्टोबर २०२२, सायंकाळी ०६:०१ – सायंकाळी ०७:१५ वाजेपर्यंत
कालावधी : १ तास १४ मिनिटं
चंद्रोदयाची वेळ : १३ ऑक्टोबर रात्री ०८:१९ वाजता

करवा चौथ पूजेसाठी लागणारे साहित्य :

करवा चौथ हा प्रत्येक विवाहितेसाठी महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी पूजेच्या ताटात पान, उपवासाच्या कथेचे पुस्तक, चाळण, कलश, चंदन यांचा समावेश करा. याशिवाय, फुले, हळद, तांदूळ, मिठाई, कच्चे दूध, दही, देशी तूप, मध, साखर पावडर, कुंकू, अक्षता, दिवा, अगरबत्ती, कापूर, गहू, वात (कापूस), खीर यांसारखे साहित्य पूजेसाठी वापरा. तसेच, या दिवशी महिला लाल रंगाची साडी नेसून, बांगड्या, सिंदूर आणि डोक्यावर लाल रंगाची ओढणी असा पूर्ण पेहराव करतात.

हे ही वाचा :

Flipkart Diwali Sale: iPhone वर भरगोस ऑफर्स तर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर ८० टक्के सूट जाणून घ्या सेलची अंतिम तारीख

Diwali 2022 : दिवाळीत बहिणीला करा खुश, भाऊबीजच्या दिवशी बहिणीला द्या ‘या’ भेटवस्तू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version