Navratri 2022 : नवरात्रीमध्ये उपवास करताना “या” गोष्टी ठेवा लक्षात

Navratri 2022 : नवरात्रीमध्ये उपवास करताना “या” गोष्टी ठेवा लक्षात

उद्या म्हणजेच दि. २६ सप्टेंबर पासून सर्वत्र नवरात्री हा सण मोठा उत्साहात साजरा केला जाणार आहे. हिंदू धर्मात नवरात्री हा सण मोठ्या थाटामाटात केला जातो. नवरात्रीमध्ये नऊ देवींची पूजा केली जाते. नऊ दिवस देवीसमोर अखंड दिवा लावला जातो. तसेच नऊ दिवस उपवास केले जातात. आणि भरपूर प्रमाणात वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. तसेच आरोग्यासाठी उपवास चांगला मानला जातो. उपवासामध्ये साबुदाण्याची खिचडी , फळे, राजगिऱ्याचे लाडू, राजगिऱ्याच्या पुऱ्या, दूध, यासारखे फळे तुम्ही सेवन करतात. हे पदार्थ आरोग्यासाठी उत्तम असतात तसेच स्वादिष्ट देखील असतात . पण उपवास करताना काही गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. तर आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत त्यामुळे तुमच्या आरोग्यास मदत होईल.

हे ही वाचा : Navratri 2022 : नवरात्रीचे नऊ रंग आणि त्या रंगाचे महत्व

 

नवरात्रीमध्ये उपवास करताना आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. उपवास करताना थोड्या-थोड्या वेळाने काही ना काही खात राहिले पाहिजे. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होईल. आणि तुम्हाला थकवा सुद्धा जाणवणार नाही.

नवरात्रीमध्ये उपवास करताना रिकाम्या पोटी राहू नये नाहीतर तुम्हाला अशक्तपणा जाणवेल. रिकाम्या पोटी उपवास केल्याने तुम्हाला अशक्ता पणा येऊ शकतो. तुम्हाला थकवा सुद्धा येऊ शकतो. जर तुम्हाला रिकाम्या पोटी उपवास करायचा असेल तर तुम्ही जास्त प्रमाणत पाणी पिया. फळे थोड्या थोड्या वेळाने खात राहा किंवा तुम्ही फळांचे रस देखील पियू शकता .

नवरात्रीच्या उपवासामध्ये तेलकट पदार्थाचे सेवन करू नका. सेवन केल्यास तुमच्या आरोग्यास हानी पोहचू शकते. म्हणून उपवासामध्ये तेलकट पदार्थाचे कमी सेवन करावे.

 

उपवास करताना सर्व एकत्र खाऊ नका . थोड्या थोड्या वेळाने खा त्यामुळे तुमचे आरोग्य निरोगी राहील .

उपवासादरम्यान शरीरात एनर्जी राहण्यासाठी बटाटा, तसेच साबुदाणेही खाऊ शकतो.

उपवासामध्ये आरोग्य निरोगी राहण्यास प्रथिने उपयुक्त पदार्थाचे सेवन करणे.

नवरात्रीच्या उपवासामध्ये फायबर असलेले पदार्थ खा . फळे, धान्य असे पदार्थाचे सेवन करा.

उपवासामध्ये शिळे अन्न खाऊ नये. शिळे अन्न खाल्यास तुम्ही आजारी पडू शकता. त्यामुळे तुम्ही ताजे अन्नाचे सेवन करा.

हे ही वाचा : 

Navratri 2022: यंदाची घटस्थापना आहे दरवर्षीपेक्षा विशेष… घ्या जाणून शुभ मुहूर्त

 

Exit mobile version