जाणून घ्या.. पंचमीच्या दिवशी साजरी केली जाणाऱ्या ऋषी पंचमीबद्दल

भाद्रपद हा सण मुख्यत्वे गणेशोत्सवासाठी ओळखला जातो. भाद्रपद महिन्याच्या तृतीयेला हरितालिका पूजन करण्याची परंपरा आहे.

जाणून घ्या.. पंचमीच्या दिवशी साजरी केली जाणाऱ्या ऋषी पंचमीबद्दल

भाद्रपद हा सण मुख्यत्वे गणेशोत्सवासाठी ओळखला जातो. भाद्रपद महिन्याच्या तृतीयेला हरितालिका पूजन करण्याची परंपरा आहे. यानंतर चतुर्थीला गणेश पूजन केले जाते आणि पंचमी ही ऋषी पंचमी म्हणून ओळखली जाते. हिंदू धर्मात असे अनेक व्रत आहेत जे फक्त महिलाच पाळतात. यातील एक महत्त्वाचे व्रत म्हणजे ऋषी पंचमी.

काल गणपती बाप्पाचे आगमन झाले. आणि बाप्पाचे आगमन झाले कि दुसऱ्या दिवशी ऋषिपंचमी हे व्रत असते. हिंदू धर्मात ऋषी पंचमीला विशेष महत्त्व आहे. या व्रतामध्ये सप्तऋषींचीपूजा केली जाते. भाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषींची मनोभावे पूजा केली जाते. यावरून या दिवसाला ऋषिपंचमी हे नाव मिळाल्याचे मानले जाते. या दिवशी बैलांच्या श्रमातून निर्माण झालेले पदार्थ न खाता दिवसभर व्रत पाळण्याचा नियम असतो. वर्षातून किमान एक दिवस तरी स्वतः कष्ट करून मिळवलेले अन्न खावे, असे यामागील मुख्य उद्दिष्ट्य असल्याचे सांगितले जाते. या व्रतामध्ये सात ऋषी आणि अरुंधती ची पूजा करण्याच्या उद्देशामागे ऋषींचे कार्य समजून घेऊन त्यांच्या प्रती आदर व्यक्त करण्याची रीत आहे. ‘स्वकष्टार्जित’ या शब्दाला ऋषींनी प्रतिष्ठा दिलेली आहे. जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी ऋषींनी सांगितलेल्या ज्ञान सिद्धांताचे वाचन, चिंतन, मनन पुढच्या पिढीने करत राहावे, याची आठवण करून देण्यासाठी ऋषिपंचमी साजरी केली जाते. महाराष्ट्राप्रमाणे नेपाळमधील महिलाही हे व्रत करतात.

ऋषि पंचमी मधील ७ ऋषि ची नावे –

कश्यप, अत्रि, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नि, वशिष्ठ

 

ऋषिपंचमीच्या भाज्या –

ऋषिपंचमीला एक विशिष्ट प्रकारची भाजी केली जाते. अळूची पाने, सुरण, वाल, लाल भोपळा, मटार, भेंडी, पडवळ, शिराळं, मक्याचे कणिस, काकडी, कोवळा माठ (भाजी) या भाज्या वापरून ही भाजी तयार केली जाते.

तसेच या व्रताच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी स्नान करून नवीन वस्त्र परिधान केले जाते. यानंतर पूजागृहात आसन घेऊन बसावे. यानंतर चौरंगावर हळद, कुंकुमपासून चौकोनी मंडळ करून सप्तऋषींची स्थापना करावी. यानंतर गंगाजल शिंपडा आणि चंदन लावा. तसेच फुलांच्या माळा अर्पण कराव्यात. यानंतर मिठाई आणि फळे अर्पण करा. या दिवशी सप्तऋषींना दूध, दही, तूप, मध आणि पाण्याने अभिषेक करावा. रोळी, तांदूळ, उदबत्ती, दिवा इत्यादींनी पूजा करावी. यानंतर तुपाचे हवन करत या व्रताची कथा ऐका. या दिवशी व्रत करताना शुद्ध मनाने व्रत केले जाते . या व्रतामुळे कळत न कळत केलेल्या पापांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे.

हे ही वाचा :- 

सूर्यकुमारच्या षटकारांच्या फटकेबाजीवर विराटने केला सलाम 

त्वचा सुंदर आणि मुलायम दिसण्यासाठी करा “हे” घरगुती उपाय

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version