spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Christmas 2022 : कशा पद्धतीने साजरा केला जातो ख्रिसमस, घ्या जाणून

दरवर्षी २५ डिसेंबर रोजी देशात आणि जगात ख्रिसमसचा (Christmas) सण साजरा केला जातो. या सणाला विशेष महत्त्व आहे. हा सण प्रामुख्याने ख्रिश्चन धर्माचा असला तरी जवळपास सर्वच धर्माचे लोक हा सण साजरा करतात.

Christmas 2022 : दरवर्षी २५ डिसेंबर रोजी देशात आणि जगात ख्रिसमसचा (Christmas) सण साजरा केला जातो. या सणाला विशेष महत्त्व आहे. हा सण प्रामुख्याने ख्रिश्चन धर्माचा असला तरी जवळपास सर्वच धर्माचे लोक हा सण साजरा करतात. होय, हा सण साजरा करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत ही आणखी एक बाब आहे. ख्रिस्ती धर्माचे लोक चर्चमध्ये जाऊन, मेणबत्त्या पेटवून, घरी प्रार्थना सभा घेऊन, केक कापून, ख्रिसमस ट्री सजवून, सर्व प्रकारचे पदार्थ बनवून आणि पार्टी करून हा सण साजरा करतात. त्यामुळे इतर धर्माच्या लोकांनाही या दिवशी चर्चमध्ये जाणे, मेणबत्त्या लावणे आणि पार्टी करणे आवडते. त्यामुळे अनेकजण ख्रिसमस ट्री सजवून आणि पिकनिक साजरी करून हा दिवस साजरा करतात. ख्रिसमस हा सण का साजरा केला जातो.

जगभरात प्रभू येशूचा जन्मदिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. युरोपियन देशात या दिवसाचं औचित्य साधत शोभायात्रा काढल्या जातात. यातून प्रभू येशूंची जीवनकार्य दाखवलं जातं. हा सण ख्रिस्ती धर्मियांसोबत इतर धर्माचे लोकही साजरा करतात. या सणाबद्दल लहान मुलांमध्ये सर्वाधिक उत्साह दिसून येतो. महिनोंमहिने या दिवसाची मुलं आतुरतेने वाट पाहात असतात. या दिवशी सांता क्लॉज मुलांना भेटवस्तू देतात, अशी मान्यता आहे. पालक त्या रुपाने मुलांना भेटवस्तू देत असतात.

जगातील जवळजवळ सर्व देशांमध्ये ख्रिसमस सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. भारतात ख्रिश्चन बांधवांची लोकसंख्या कमी आहे. तरी देखील हा सण देशात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. ख्रिसमसच्या दिवशी लोक एकमेकांना भेटून पार्टी करतात, फिरतात आणि चर्चमध्ये प्रार्थना करतात. ख्रिस्ती बांधव आपल्या घराला अतिशय सुरेख पध्दतीने सजवितात. ख्रिसमसच्या दिवशी लहान मुलांना सॉक्समधून भेटवस्तू दिल्या जातात. अनेक शाळांना या दरम्यान आठ दिवसांची सुट्टी देखील असते. घरी केक बनवले जातात आणि सर्व्ह केले जातात. भारतात विशेषत: गोव्यात ख्रिसमस अतिशय उत्साहाने साजरा केला जातो.

सांता क्लॉज –

सांता निकोलस यांना सांता क्लॉजच्या नावाने ओळखलं जाते. त्यांचा जन्म प्रभू येशूनंतर जवळपास २८० वर्षांना झाला होता. सांता निकोलस यांनी आपलं पूर्ण जीवन प्रभू येशूंना समर्पित केलं होतं. दरवर्षी ते येशूच्या जन्मदिनाचं औचित्य साधत अंधारात मुलांना भेटवस्तू द्यायचे. तेव्हापासून आतापर्यंत ही प्रथा आहे. आजही लोकं सांता क्लॉज बनून मुलांना भेटवस्तू देतात.

ख्रिसमस ट्री –

ख्रिसमस सणादिवशी ख्रिसमस ट्री सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. या दिवशी या झाडाची विशेष सजावट केली जाते. काही ठिकाणी ख्रिसमस ट्रीवर गिफ्ट लावलेली पाहायला मिळतात.

कशी चालू झाली ख्रिसमस साजरा करण्याची प्रथा?

पहिल्यांदा ख्रिसमसचा सण ख्रिस्तपूर्व ३३६मध्ये २५ डिसेंबर रोजी ख्रिश्चन धर्माच्या एका राजाने साजरा केला होता. यानंतर अनेक वर्षांनी पोप ज्यूलियस यांनी अशी घोषणा केली की २५ डिसेंबर हा दिवस येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जावा. या दिवसाबद्दल ख्रिश्चन धर्मात अनेक प्रसिद्ध कथा आहेत. यापैकी एक अशी की येशूची माता मेरीला हे आधीपासूनच ठाऊक होते की ती एका चमत्कारी बाळाला जन्म देणार आहे. तिने २५ मार्च रोजी घोषणा केली होती की तिच्या पोटी एक अद्भुत बालक जन्म घेणार आहे आणि त्याच दिवशी उत्सव साजरा करण्यात आला होता. २५ मार्चनंतर बरोबर नऊ महिन्यांनी २५ डिसेंबर येतो ज्यादिवशी येशूचा जन्म झाला. जगभरात २५ मार्चचा दिवसही धूमधडाक्यात साजरा केला जातो. असेही मानले जाते की येशूचा मृत्यू याच दिवशी झाला होता.

 

हे ही वाचा:

CHRISTMAS 2022 ख्रिसमस सण साजरा करण्याची विविध देशांची विविध पद्धती

Christmas 2022 जाणून घ्या नाताळ विषयी थोडक्यात माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss