जाणुन घ्या… हरतालिकेची पूजा कशी कराल

हरितालिका हा सण हिंदु धर्मातील सर्व प्रमुख मानल्या जात असलेल्या व्रतांपैकी एक महत्वपुर्ण व्रत म्हणुन ओळखले जाते. हे व्रत सर्व स्त्रियांद्वारे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला केले जात असते.

जाणुन घ्या… हरतालिकेची पूजा कशी कराल

हरितालिका हा सण हिंदु धर्मातील सर्व प्रमुख मानल्या जात असलेल्या व्रतांपैकी एक महत्वपुर्ण व्रत म्हणुन ओळखले जाते. हे व्रत सर्व स्त्रियांद्वारे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला केले जात असते. या दिवशी सर्व विवाहीत तसेच अविवाहीत स्त्रिया देखील शिवशंकराची म्हणजेच महादेवाची मोठया भक्तीभावाने पुजा,अर्चना,आराधना करीत असतात. या व्रतामध्ये पुर्ण दिवस स्त्रिया पाणी देखील पित नाहीत.संपुर्ण निर्जल व्रत या दिवशी स्त्रिया करत असतात. जेव्हा त्यांची पुजा संपन्न होत असते त्याच दिवशी सर्व स्त्रिया आपले हे व्रत तोडत असतात.

या दिवशी मुली आणि सुवासिनींनी अंगाला सुवासिक तेल लावून स्नान करावे. स्नान केल्यानंतर स्वच्छ जागेवर एका जागी चौरंग ठेवावा. रांगोळी काढून आणि केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर वाळू आणून पार्वती आणि सखीसह शिवलिंग स्थापित करावे. उजव्या बाजूस गणपती मांडावा. समोर पाच विडे मांडून तेथे सुपारी, खारीक, बदाम, नाणे, फळ ठेवावे. सर्वप्रथम स्वत:ला हळद कुंकु लावून देवासमोर विडे ठेवावे. अक्षदा, हळद कुंकु वाहून मनोभावे नमस्कार करावा. घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून पूजेला प्रारंभ करावा. सर्वप्रथम गपपती पुजन आणि नंतर महादेव व सखी-पार्वतीची षोडशोपचारे पूजा करावी. पूजेसाठी घेतलेले साहित्य विधीपूर्वक देवाला अर्पित करावे. पूजा केल्यावर धूप-दीप, नैवेद्य दाखवून पत्री वाहावी. दिवसभर कडक उपोषण करावे. शक्य नसल्यास फलाहार करावा. या दिवशी आगीवर बनविलेला कोणताही पदार्थ खात नाहीत. नंतर रात्रभर झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोफ इत्यादी खेळ खेळत जागरण करून हरतालिकेची कथा ऐकून, आरती करून दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करून शिवलिंगाचे विसर्जन करावे.

हे ही वाचा :- जाणून घ्या… हरतालिका उपवासाचे महत्व

हरतालिका पूजेसाठी लागणारी सामग्री पुढीलप्रमाणे – 

पांढरे फुलं, केळीचे पान, सर्व प्रकारची फळे आणि फुले, बेल पत्र, शमी पत्र, आंब्याची पानं,, श्रीफळ आणि दातुराची फुले, एकवान फूल, तुळशी, नाडा, कपडे, माता गौरीसाठी पूर्ण सौभाग्याचं सामान ज्यामध्ये बांगड्या, मेण, काजळ, बिंदी, कुंकु, सिंदूर, कंगवा, माहूर, मेहंदी इत्यादी विश्वासानुसार गोळा केल्या जातात.हळदकुंकू, अष्टगंध, गुलाल, तूप, तेल, दिवा, कापूर, अबीर, चंदन, कलश. पंचामृत – तूप, दही, साखर, दूध, मध.

हे ही वाचा :-

भाद्रपद महिन्यातील तृतियेला पार्वतीचा केला पत्नी म्हणून स्विकार, जाणून घ्या हरतालिकाची कथा

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version