spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Navratri 2022 : नवरात्रीमध्ये कळस स्थापनेचे महत्व आणि पूजा विधी कशी करायची?, जाणून घ्या

नवरात्री काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. तसेच हिंदू धर्मात नवरात्रीला खूप महत्व आहे. आणि नवरात्री हा सण मोठ्या धुमधडाक्यात केला जातो. तसेच नवरात्री हा सण २६ सप्टेंबर २०२२ रोजी सुरु होत आहे. नवरात्री मध्ये नऊ दिवस माता दुर्गेची उपासना करतात. आणि अखंड दिवा लावला जातो. नवरात्री मध्ये कळस स्थापनाचे खूप महत्व आहे. नवरात्रीच्या विधींमध्ये कोणताही अडथळा येऊ नये म्हणून घटस्थापना केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते.

हे ही वाचा : Navratri 2022 : दुर्गा मातेने अप्सरचे रूप धारण करून, केला महिषासुराचा वध

 

घटस्थापनेचे महत्व –

नवरात्रीच्या विधींमध्ये कोणताही अडथळा येऊ नये म्हणून घटस्थापना केली जाते. घटस्थापना हे गणेशाचे प्रतीक मानले जाते. कळसाची स्थापना केल्याने घरात सकारत्मक आणि निरोगी वातावरण राहते. नवरात्री निमित्त अनेक घरात घटस्थापना केली जाते. घटस्थापना मनःपूर्वक केल्याने दुर्गा देवीची कृपा होते असे म्हटले जाते. घटस्थापना समोर देखील अखंड दिवा लावला जातो. आणि तो विजू नये ९ दिवस याची काळजी घेतली जाते.

 

घटस्थापनेचे साहित्य –

घटस्थापनेसाठी धान्याची पेरणी केली जाते. त्यासाठी तांदूळ किंवा गहू पेरणी साठी वापरू शकता. पेरणीसाठी तुम्ही मातीच्या भांड्याचा वापर करू शकता. तसेच आंब्याची झाडांची पाने, हळद , कुंकू , फळे , फुले , धागा , वेणी , नाणे , सुपारी , दिवे इत्यादींचा समावेश असावा.

पूजा विधी-

सर्व प्रथम, एका मोठ्या मातीच्या भांड्यात स्वच्छ माती टाका आणि त्यात धान्याचे दाणे टाका. त्यानंतर त्यावर पाणी शिंपडा.

यानंतर कळसावर धागा बांधून कळसाला कुंकू लावा.

यानंतर थोडे पाणी घालून त्यात गंगाजल मिसळा.

पाण्यात सुपारी, दुर्वा, तांदूळ आणि नाणे टाका.

कळसात आंब्याची पाच पाने ठेवा.

एक नारळ घ्या तो कळसावर ठेवा त्यात थोडे पैसे देखील ठेवा.

यानंतर जमीन पूर्णपणे स्वच्छ करा आणि सर्वप्रथम ज्या मातीच्या भांड्यात धान्य पेरली आहे ते ठेवा.

त्यानंतर त्यावर कलश स्थापित करा आणि सर्व देवतांचे ध्यान करून पूजा सुरू करा.

हे ही वाचा :

Navratri 2022 : काय आहे नवरात्रातील अखंड ज्योतचं महत्व ? घ्या जाणून

 

Latest Posts

Don't Miss