The Academy School (TAS)च्या विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने साजरी केली जन्माष्टमी

- दहीहंडीच्या माध्यमातून लिंग समानतेला देण्यात आले प्रोत्साहन - विद्यार्थ्यांना सांस्कृतिक महत्त्व समजण्यास झाली मदत

The Academy School (TAS)च्या विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने साजरी केली जन्माष्टमी

जन्माष्टमी म्हंटल की सर्व गोपाळांसाठीचा असा आवडता खेळ. दहीहंडी (ज्याला गोपाळकाला किंवा उत्लोत्सवम् असेही म्हणतात) हा भारतातील एक मनोरंजन आणि स्पर्धात्मक कार्यक्रम आहे, जो कृष्ण जन्माष्टमी या कृष्णाचा जन्म साजरा करणाऱ्या हिंदू सणाशी संबंधित आहे. या दहीकालेसाठी सर्वजण उत्सुक असतात. या दरम्यान अनेक नवे उपक्रम सुद्धा राबवले जातात. असाच एक उत्तम उपक्रम हा पुण्यातील द अकादमी स्कूल (टास) यांनीही राबवला आहे. ज्यात श्रीकृष्णाने सांगितलेल्या समता धर्माचा बाळकडू मुलांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला आहे.

विद्यार्थ्यांमध्ये लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी, द अकादमी स्कूल (टास) कडून जन्माष्टमी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी ‘समतेची दहीहंडी’ फोडून जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली. शिशु वर्ग ते इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी कृष्ण आणि राधाची वेश भूषा केली होती. दहीहंडी फोडण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी विविध धार्मिक विधी देखील केले. द अकादमी स्कूल कडून आयोजित करण्यात आलेल्या या दहीहंडीमुळे विद्यार्थ्यांना सणाची ओळख होण्यासोबतच सध्या समाजामध्ये सुरु असलेल्या घटनांची माहिती मिळाली. हा उपक्रम टासच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैथिली तांबे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी पौराणिक कथे पुरते मर्यादित न राहता आधुनिक पद्धतीने सणाचे महत्त्व समजून देणे हा मुख्य हेतू होता. त्यामुळे शाळेने सणाचा खरा अर्थ आणि देवतांचे खरे स्वरूप विद्यार्थ्यांना उत्सवाच्या निमित्ताने समजावून सांगण्याचा निर्णय घेतला असल्याचे डॉ. मैथिली तांबे यांनी सांगितले.

सण साजरे करण्याच्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना सणांबद्दल नवा दृष्टिकोन मिळेल. भगवान श्रीकृष्ण महिलांमध्ये अतिशय पूजनीय आहेत. श्रीकृष्णाचा जन्म आनंदाच प्रतीक मानले जाते. त्यांनी कधीही स्त्री आणि पुरुष यामध्ये भेदभाव केला नाही. ते लैंगिक समानतेचे प्रतीक आहेत. विद्यार्थ्यांना ही संकल्पना मजेशीर आणि सांस्कृतिक पद्धतीने समजून घेता यावी, यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. याच माध्यमातून विद्यार्थ्यांना भारताच्या समृद्ध सांस्कृतिकची ओळख होऊन, लिंग समानतेसारख्या महत्त्वाच्या संकल्पनेची ओळख झाली असल्याचे डॉ. मैथिली तांबे यांनी सांगितले.

हे ही वाचा:

“प्रधानमंत्रांसारख्या मोठ्या माणसाला काळे झेंडे दाखवता हे सर्वथा अनुचित आहे”; Dada Bhuse यांचे मंतव्य

“विकृत मानसिकता सत्ताधाऱ्यांमुळे होत असेल तर ही शोकांतिका”; Praniti Shinde यांचा सत्ताधाऱ्यांना टोला

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version