Lalbaugcha Raja Visarjan 2024: ‘गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणत लालबागच्या राजाचे विसर्जन संपन्न

Lalbaugcha Raja Visarjan 2024: ‘गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणत लालबागच्या राजाचे विसर्जन संपन्न

हायड्रॉलिक्सचा वापर करून यांत्रिक तराफ्याच्या सहाय्याने लालबागच्या राजाला खोल समुद्रात नेऊन निरोप जड अंतःकरणाने निरोप देण्यात आला. 22 तासांनंतरही गणेशभक्तांचा उत्साह कमी झाला नव्हता. लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने गणेशभक्त उपस्थित होते. लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणूक मार्गावर मुंबईकरांनी मोठी गर्दी केली होती. 23 तासांच्या उत्साहपूर्ण वातावरणात आणि ढोलताशांच्या गजरात निघालेल्या विसर्जन मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचे गिरगाव समुद्रात विसर्जन करण्यात आले.

अनेक गणेश भक्तांच्या आकर्षणाचा विषय असलेला लालबागचा राजा आता गिरगाव चौपाटीत सकाळी ७.३० वाजता दाखल झाला होता. लालबागच्या राजाला मंगळवारी म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी 11 वाजता मंडपातून विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ करण्यात आले होते. त्यानंतर लालबागचा राजा हा भारतमाता सिनेमा, लालबाग, चिंचपोकळी पूल, बकरी अड्डा, भायखळा रेल्वे स्थानक, क्लेयर रोड, नागपाडा, डंकन रोड, ऑपेरा हाऊस असा प्रवास करून गिरगाव चौपाटीवर दाखल झाला होता. यावर्षी लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला गिरगाव चौपाटी येथे पोहचायला वीस तास लागले. लालबागच्या राजाची मिरवणूक गिरगाव चौपाटीवर दाखल झाल्यानंतर गिरगाव चौपाटी येथे लालबागच्या राजाची आरती करण्यात आली. गिरगाव चौपाटी या ठिकाणी गणेश भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.

२०२५ मध्ये गणेश चतुर्थी कधी? 

हिंदू पंचांगानुसार दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीपासून गणेशोत्सव (Ganeshotsav) साजरा केला जातो. पुढच्या वर्षी गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) २७ ऑगस्ट २०२५ रोजी येणार असल्याची माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली. त्यामुळे गणेश भक्तांना पुढच्या वर्षी जास्त वाट पाहावी नाही लागणार. पुढील वर्षी २ सप्टेंबर २०२५ रोजी गौरी-गणपतींचं विसर्जन केले जाईल. पुढील वर्षी अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) ६ सप्टेंबरला म्हणजेच अकराव्या दिवशी होणार आहे. अश्याप्रकारे पुढील वर्षी २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ या दिवसांमध्ये गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. २०२५ म्हणजेच पुढच्या वर्षी गणेश भक्तांना गणेशोत्सवाची कमी वाट पाहावी लागणार आहे. कारण; सप्टेंबर महिन्याऐवजी ऑगस्ट महिन्यातच बाप्पा विराजमान होणार आहेत.

हे ही वाचा:

Hezbollah Pager Blasts: पेजर म्हणजे नेमकं काय? पेजरला हॅक करता येतं का?

Priya Bapat Birthday Special : प्रिया बापट अभिनयासोबतच ‘या’ कलेत आहे पारंगत…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version