spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Lalbaugcha Raja Visarjan 2024: लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर, अनेक भक्तांच्या उपस्थिती होणार बाप्पाचे विसर्जन

Lalbaugcha Raja Visarjan 2024: अनेक गणेश भक्तांच्या आकर्षणाचा विषय असलेला लालबागचा राजा आता गिरगाव चौपाटीत दाखल झाला आहे. लालबागच्या राजाला मंगळवारी म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी 11 वाजता मंडपातून विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ करण्यात आले होते. त्यानंतर लालबागचा राजा हा भारतमाता सिनेमा, लालबाग, चिंचपोकळी पूल, बकरी अड्डा, भायखळा रेल्वे स्थानक, क्लेयर रोड, नागपाडा, डंकन रोड, ऑपेरा हाऊस असा प्रवास करून गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. यावर्षी लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला वीस तास लागले. आता लालबागच्या राजाची मिरवणूक गिरगाव चौपाटीवर दाखल झाली असून गिरगाव चौपाटी येथे लालबागच्या राजाची आरती करण्यात येणार आहे. गिरगाव चौपाटी या ठिकाणी गणेश भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.

यासोबतच सार्वजनिक मंडळाचा गणपती चिंचपोकळीचा चिंतामणी (Chinchpokalicha Chintamani) गिरगाव चौपाटीवर दाखल झाला असून काल रात्री अकरा वाजता समुद्राला मोठी भरती आली होती, त्यामुळे गणेश मंडळांना काही काळ गणेश मूर्तींचे विसर्जन करता आले नव्हते. म्हणूनच काही गणेश मंडळाच्या गणपतीच्या मूर्तींचे विसर्जन अजून बाकी असल्याचे पाहायला मिळत आहे.

२०२५ मध्ये गणेश चतुर्थी कधी? 

हिंदू पंचांगानुसार दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीपासून गणेशोत्सव (Ganeshotsav) साजरा केला जातो. पुढच्या वर्षी गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) २७ ऑगस्ट २०२५ रोजी येणार असल्याची माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली. त्यामुळे गणेश भक्तांना पुढच्या वर्षी जास्त वाट पाहावी नाही लागणार. पुढील वर्षी २ सप्टेंबर २०२५ रोजी गौरी-गणपतींचं विसर्जन केले जाईल. पुढील वर्षी अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) ६ सप्टेंबरला म्हणजेच अकराव्या दिवशी होणार आहे. अश्याप्रकारे पुढील वर्षी २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ या दिवसांमध्ये गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. २०२५ म्हणजेच पुढच्या वर्षी गणेश भक्तांना गणेशोत्सवाची कमी वाट पाहावी लागणार आहे. कारण; सप्टेंबर महिन्याऐवजी ऑगस्ट महिन्यातच बाप्पा विराजमान होणार आहेत.

महायुतीत शिंदे गट आणि अजित पवार गट दोघेही आश्रित, भाजपचे तुकडे त्यांना स्वीकारावे लागतील: Sanjay Raut

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss