Makar Sankranti 2023, संक्रांतीचा पुण्यकाळाबद्दल सविस्तर घ्या जाणून

सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत होणारे भ्रमण अर्थात संक्रमण हा काळ पुण्यकाळ मानला जातो . 'पुण्यकाळ' किंवा 'पर्वकाळ' म्हणजे या काळात केलेले दानधर्म, तीर्थयात्रा अधिक फलदायक होतात म्हणून या काळाला पुण्यकाळ किंवा पर्वकाळ म्हणतात.

Makar Sankranti 2023, संक्रांतीचा पुण्यकाळाबद्दल सविस्तर घ्या जाणून

सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत होणारे भ्रमण अर्थात संक्रमण हा काळ पुण्यकाळ मानला जातो . ‘पुण्यकाळ’ किंवा ‘पर्वकाळ’ म्हणजे या काळात केलेले दानधर्म, तीर्थयात्रा अधिक फलदायक होतात म्हणून या काळाला पुण्यकाळ किंवा पर्वकाळ म्हणतात.

गुरु बदल – शनी बदल हे ग्रह दीर्घकाळ राशी भोगतात, म्हणजे साधारण १३ महिने एका राशीमध्ये गुरुचे भ्रमण असते, तर शनिचे अडीच वर्षे (साडेसाती) या विषयाचा गवगवा खूप मोठ्या प्रमाणात होतो. या ग्रहांचा एका राशीत रहाण्याचा भोग्यकाळ किंवा त्याच्या राश्यांतराचा काळ अधिक असल्याने त्याचे परिणाम दीर्घकालपर्यंत दिसून येतात.

मात्र चंद्र – सूर्य-मंगल-बुध -शुक्र यांचा भ्रमण काळ साधारण २. ५ दिवसापासून ९० दिवस असा अनुक्रमे कमी कडून अधिक तर राहू- केतू या ग्रहांचा काळ १८ महिने असतो. अर्थात प्रत्येक ग्रहाचे राश्यांतर होते मात्र त्यातील सूर्य हा ग्रह ३० दिवसाच्या कालावधीत राश्यांतर करतो. सूर्य संक्राती ही नैसर्गीक ऋतुमानाशी संबंधीत असते. सूर्याच्या संक्रातीमुळे ऋतु मास यांची गणना होते.

मेष संक्राती सूर्य आश्विनी नक्षत्राच्या जवळपास पौर्णिमा असते म्हणून आश्विन मास, कृत्तिका नक्षत्रातील पौर्णिमा तो कार्तिकमास, अशी महिण्याच्या संक्रातीनुसार आपली कालगणना मोजली जाते. मेष राशीतील संक्रातीपासून आपली म्हणजेच चैत्र महिण्यापासून हिंदु वर्षाची सुरुवात होते. निसर्ग ऋतुमान त्याच्या या भ्रमणाचा अभ्यास करून आलेल्या अनुभवाला अनन्यसाधारण महत्व शास्त्रकारांनी दिलेले आहे.

सूर्य संक्रांत –

राशी चक्रामध्ये मेष ते मीन अशा १२ राशी असल्याचे दिसून येते. त्यातील मेष ते मीन या प्रत्येक राशीतील सूर्य प्रवेशास ती संक्रांत म्हणून ओळखले जाते.
त्या अनुक्रमे
मेष संक्रांत,
वृषभ संक्रांत,
मिथुन संक्रांत,
कर्क संक्रांत,
सिंह संक्रांत,
कन्या संक्रांत,
तुला संक्रांत,
वृश्चिक संक्रांत,
धनु संक्रांत,
मकर संक्रांत,
कुंभ संक्रांत,
मीन संक्रांत म्हणून ओळखले जाते.

या १२ संक्रांति पैकी मकर राशीतील सूर्याचे भ्रमण मकर राशित म्हणजे “मकर संक्रांत” होय.

या संक्रांतीच्या काळात स्त्रियांसाठी विशेष व्रत वैकल्ये करण्याचा नियम पूर्वापार चालत आल्याची परंपरा आहे. हिंदू कालगणनेच्या सौर पंचांगानुसार आणि साधारण इंग्रजी कालगणनेप्रमाणे हा दिवस १४ किंवा १५ जानेवारी या तारखेला प्रत्येक वर्षी मकर संक्रांत हा योग बनतो.

मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. एका राशीतून दुसऱ्या राशीत सूर्याच्या प्रवेशास ‘संक्रांती’ म्हणतात. खरे तर, मकर संक्रांतीमधील, ‘मकर’ हा शब्द मकर राशीचे प्रतीक आहे व ‘संक्रांती’ म्हणजे संक्रमण. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या दिवसाला ‘मकर संक्रांती’ म्हणतात. शनिवार दिनांक १४ जानेवारी २०२३ रोजी रात्री ८.४४ वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. यंदा मकर संक्रांतीचा उत्सव शनिवारी दिनांक १५/०१/२०२३ रोजी साजरा करावा.

– ज्यो. रवींद्र पाठक गुरुजी , ठाणे
8108266672

हे ही वाचा:

Makar Sankranti 2023, आज संक्रांतीचा पहिला दिवस, भोगीच्या दिवशी नक्की काय करतात ?

Makar Sankranti 2023, मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर गंगा नदीच्या काठावर भाविकांची गर्दी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version