जाणून घेऊया… गणेश चतुर्थीचं महत्त्व

यंदाच्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये गणेश चतुर्थी ३१ ऑगस्टला आहे. संपूर्ण भारतात आणि विदेशातही लोक आपापल्या परंपरेनुसार दीड दिवस ते अगदी ११ दिवसापर्यंत गणपतीची स्थापना करून गणेशोत्सव साजरा करतात.

जाणून घेऊया… गणेश चतुर्थीचं महत्त्व

यंदाच्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये गणेश चतुर्थी ३१ ऑगस्टला आहे. संपूर्ण भारतात आणि विदेशातही लोक आपापल्या परंपरेनुसार दीड दिवस ते अगदी ११ दिवसापर्यंत गणपतीची स्थापना करून गणेशोत्सव साजरा करतात.

हिंदू कॅलेंडरनुसार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणेश चतुर्थी (ganesh chaturthi) साजरी केली जाते. गणपती बाप्पाचा जन्मदिवस म्हणून गणेश चतुर्थी साजरी केली जाते. असं मानलं जातं की, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षादरम्यान गणपती म्हणजेच गण+पती = गणपती देवाचा जन्म झाला होता. इंग्रजी कॅलेंडरनुसार हा दिवस ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात येतो. हा दिवस चार्तुमासात येतो. हा सण चतुर्थी ते भाद्रपद महिन्याच्या चतुर्दशीपर्यंत दहा दिवस चालत असतो. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश चतुर्थी असेही म्हणतात. चार्तुमास हे अनेक सणांनी भरलेले महिने आहेत.

हे ही वाचा :- श्रावण महिन्याचा उपवास करत आहात तर, हे ‘वेज’ पदार्थ नक्की करून खा 

भगवान शंकर आणि पार्वती पुत्र गणपती हे बुद्धीची देवता आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आद्य देवता गणपतीची स्थापना करून पूजा केली जाते. तसेच हिंदू धर्मात भगवान श्री गणेशाला प्रथम पूजेचा मान आहे. कोणतंही कार्य असल्यावर सर्वात आधी गणपतीची पूजा केली जाते. कारण गणपती विघ्नहर्ता आहे. गणपतीची अनेक नावं आहेत त्यापैकीच हे एक नाव. विघ्नहर्ता अर्थात संकटाचं हरण करणारा असं आहे. म्हणून प्रत्येक शुभ कार्याच्या वेळी सर्वात आधी गणपतीची पूजा केली जाते. तसेच गणेशोत्सवाचा पहिला दिवस असतो गणेश चतुर्थीचा . या दिवशीच प्रारंभ होतो गणेशोत्सवाला. गणेशाच्या आगमनाने सगळीकडेच भक्तीमय वातावरण दिसून येते.

पौराणिक कथेनुसार, भगवान गणेशाची निर्मिती माता पार्वतीने चंदनाच्या लेपापासून केली होती. शक्तीची देवता असल्याने माता पार्वतीने श्री गणेशाला एवढे सामर्थ्य आणि शक्ती दिली की अनेक मोठ्या देवांनाही युद्धात गणेशाचा सामना करता आला नाही. अखेर भगवान शवप्रभूंनी नकळतपणे श्री गणेशाचा शिरच्छेद केला. माता पार्वतीला याबाबत काळाले तेव्हा त्यांचा क्रोध अनावर झाला. त्यांनी गणेशाला पुन्हा जिवंत करण्याची मागण केली. त्यानंतर शिवप्रभूंनी हत्तीचे मुंडके गणेशाच्या धडावर ठेवले आणि त्यामुळे हत्तीमुखी श्रीगणेशाची निर्मिती झाली. गणेश चतुर्थीच्या या शुभ दिवशी भगवान शिवप्रभूंनी कोणत्याही देवाच्या पूजेआधी श्री गणेशाची पूजा केली जाईल असा आशिर्वाद दिला. त्यामुळे कोणत्याही देवाच्या आधी श्री गणेशाची पूजा केली जाते. ज्ञान आणि शक्तीचे प्रतीक म्हणून नेहमी श्री गणेशाची पूजा केली जाते.

गणपती बाप्पा हे हिंदूंची मूळ देवता आहे. हिंदू धर्मात गणपती बाप्पाला विशेष स्थान देण्यात आले आहे. मग तो कोणताही धार्मिक सण, यज्ञ, पूजा इत्यादी असो, मग ते एखादे चांगले काम असो किंवा लग्न सण असो, कोणतेही काम पूर्ण झाले, म्हणून गणपती बाप्पाची पूजा सर्वात आधी केली जाते. महाराष्ट्रात राष्ट्रकूट, चालुक्य वगैरे सात वाहने गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसाला सुरू झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनीही गणेशाची पूजा केली.

 

हे ही वाचा :-

गणेश चतुर्थीनिमित्त पूजा विधी, व्रत विधी आणि विशेष मंत्र जाणून घ्या महत्वाची माहिती

घरच्याघरी सोप्या पद्धती वापरून करा… बाप्पाचे डेकोरेशन

Exit mobile version