Makar Sankranti 2023 मकरसंक्रांतीच्या निमित्ताने घरी बनवा साऊथ इंडियन स्पेशल पोंगल

पोंगल हा पदार्थ काहीसा महाराष्ट्रातल्या खिरीसारखा असला तरी त्याला देण्यात आलेल्या पारंपरिक दक्षिण भारतीय टचमुळे तो काहीसा वेगळा ठरतो.

Makar Sankranti 2023 मकरसंक्रांतीच्या निमित्ताने घरी बनवा साऊथ इंडियन स्पेशल पोंगल

मकर संक्रांती (Makar Sankranti 2023) हा संपूर्ण उत्तर भारतातील एक विशेष सण आहे. यासोबतच पंजाबमध्येही लोहरी साजरी केली जाते. तर दक्षिण भारतात हा पोंगल (पोंगल 2023) म्हणून साजरा केला जातो. याला गुजरातमध्ये उत्तरायण आणि पूर्व उत्तर प्रदेशात खिचडी उत्सव असेही म्हणतात. या सणाला कितीही नावं असली तरी भावना एकच आहे. ज्याप्रमाणे राज्यांच्या नावांनुसार त्याची नावे वेगळी आहेत, त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या निमित्ताने प्रत्येक राज्यात त्यांचे काही पारंपारिक पदार्थ (Makar Sankranti 2023 Recipe) बनवले जातात.

दक्षिण भारतात मकरसंक्रांतीच्या दिवशी आवर्जून एक पदार्थ बनवला जातो आणि तो म्हणजे पोंगल. पोंगल हा पदार्थ काहीसा महाराष्ट्रातल्या खिरीसारखा असला तरी त्याला देण्यात आलेल्या पारंपरिक दक्षिण भारतीय टचमुळे तो काहीसा वेगळा ठरतो. त्यामुळे तुम्हालाही जर तिळाच्या लाडवांपेक्षा एखादा वेगळा आणि गोड पदार्थ खाऊन तुमच्या मकरसंक्रांतीची सुरुवात करायची असेल तर तुम्ही हा पदार्थ नक्की बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया कशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी बनवू शकता पोंगल:

गोड पोंगल बनवण्यासाठी साहित्य:

गोड पोंगल रेसिपी :

  1. गोड पोंगल बनवण्यासाठी प्रथम एक वाटी मूग डाळ आणि दोन वाटी तांदूळ दोन चमचे खोबरेल/तीळ तेलात किंचित तपकिरी होईपर्यंत तळा.
  2. मिश्रण थंड होऊ द्या आणि नंतर प्रेशर कुकरमध्ये लावून घ्या.
  3. मिश्रणात समान प्रमाणात पाणी घाला आणि गॅस चालू करा. दोन शिट्ट्या होईपर्यंत थांबा आणि नंतर गॅस बंद करा.
  4. १.५ कप गूळ पावडर घाला आणि ते विरघळेपर्यंत उकळवा आणि सर्व साहित्य चांगले मिसळा.
  5. १/२ टीस्पून वेलची पावडर आणि १/२ कप चिरलेला ड्रायफ्रूट्स घाला.
  6. घ्या तुमचा गोड पोंगल तयार आहे.

हे ही वाचा:

makarsankrant 2023 भोगीच महत्व काय? का जगभरात साजरी केली जाते भोगी? जाणून घ्या

Makar Sankrant 2023 खिचडी आणि मकर संक्रांतीचे आहे खूप खास नाते, जाणून घ्या त्यामागे दडलेले आध्यात्मिक कारण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version