Makar Sankranti 2023, यंदाच्या वर्षी मकर संक्रांत १४ ला आहे कि १५ जानेवारीला ?

Makar Sankranti 2023, यंदाच्या वर्षी मकर संक्रांत १४ ला आहे कि १५ जानेवारीला ?

२०२३ या नव्या वर्षाची सुरुवात झाली आहे. जानेवारी महिना सुरु झाला कि अनेकांना तिळाचे लाडू खाण्याची ईच्छा होते म्हणजेच मकरसंक्रांती या सणाचे वेध लागतात. जानेवारी महिन्यातील हा पहिला सण असतो. तर दुसरीकडे जर आपण हिंदू कॅलेंडरप्रमाणे पहिले तर, मकर संक्रांतीचा (Makar Sankrant 2023) सण पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वादशी तिथीला साजरा केला जातो. हा असा सण आहे कि या सणाला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. तर यंदाच्या वर्षी मकर संक्रांत हि १४ जानेवारीला साजरी करायची कि १५ जानेवारीला असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

पंचांगानुसार, शनिवारी, १४ जानेवारी रोजी सूर्याच्या मकर संक्रांतीचा मुहूर्त ८:१४ वाजता आहे, परंतु रात्री स्नान आणि दान नाही. यासाठी उदयतिथीची श्रद्धा आहे, म्हणजे सूर्योदय केव्हा होईल, त्या वेळी मकरसंक्रांत स्नान व दान करावे. अशा परिस्थितीत या वर्षी मकर संक्रांती रविवार, १५ जानेवारी २०२३ रोजी साजरी होणार आहे. १५ जानेवारी रोजी सकाळी ७. १५ ते ५. ४६ पर्यंत असेल आणि त्याचा मोठा शुभ काळ सकाळी ७. १५ ते ९. ०० पर्यंत आहे.

जर हिंदू धर्माच्या नागरिकांमध्ये मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. मकर संक्रांतीमधील, ‘मकर’ हा शब्द ‘मकर राशीचे’ प्रतीक आहे व ‘संक्रांती’ म्हणजे संक्रमण. मकर संक्रांतीच्या दिवशीच सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून याला ‘मकर संक्रांत’ म्हणतात. सूर्य देव जेव्हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात, त्या दिवसाला मकर संक्रांती किंवा उत्तरायण म्हणून म्हटलं जातं. या दिवशी सूर्यदेव उत्तरायण असतात, असं म्हणतात. मकर संक्रांतीला प्रत्येक धर्मात किंवा राज्यात वेगगवेग्ळ्या पद्धतीने ओळखले जाते. महाराष्ट्रात जसे मकर संक्रात म्हणतात तसेच लोहरी, उत्तरायण, खिचडी, टिहरी, पोंगल (pongal 2023) इत्यादी नावांनीही ओळखले जाते. यंदाच्या वर्षीच्या मकर संक्रांतीवर काही विशेष योगायोग घडत आहेत. यावेळी सूर्य आणि शनि एकत्र मकर राशीत असतील. हे संयोजन अत्यंत दुर्मिळ आहे. यापूर्वी १९९३ मध्ये या योग घडला होता. त्यानंतर २९ वर्षांनी हा दुर्मिळ योग पुन्हा घडणार आहे.

मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी दान केल्याने आपल्या घरात सुख-शांती नांदते अशी आख्यायिका आहे. त्याचबरोबर या दिवशी गूळ आणि तीळ दान केल्याने कुंडलीतील सूर्य आणि शनीच्या स्थितीपासून शांती मिळते. तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी मीठ दान केल्याने देखील शुभ लाभ मिळतो. या दिवशी गाईच्या दुधापासून बनवलेले तूप दान केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते, असे मानले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी अन्नपूर्णा दान केल्याने माता अन्नपूर्णा प्रसन्न होते. शनिदेवाची साडेसाती प्रभावित झालेल्या लोकांनी तांब्याच्या भांड्यात काळे तीळ भरून ते एखाद्या गरीब व्यक्तीला दान करावे.

हे ही वाचा:

शिंदेगट ही एक टोळी आहे आणि टोळीला अस्तित्व नसतं, संजय राऊतांची शिंदे गटावर टीका

कपड्यांमुळे चित्रा वाघ यांच्या निशाणावर असलेली Uorfi Javed नक्की आहे तरी कोण ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version