spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Makar Sankranti 2023, आज संक्रांतीचा पहिला दिवस, भोगीच्या दिवशी नक्की काय करतात ?

मकर संक्रांत (Makar Sankranti) सणाचा भोगी (Bhogi) हा पहिला दिवस मानला जातो. स्त्रिया आजच्या दिवशी तिळाचे उटणे आणि तिळाचे तेल लावून अभ्यंग स्नान करतात. आपण शुचिर्भूत होऊन देवदिकांनाही आरसा – फणी आदि शृंगार अर्पण करतात. तीळ लावून बाजरीची भाकरी, खिचडी,कढी, मिक्स भाजी तयार करून घरच्या देवाला नैवेद्य दाखवतात. सायंकाळी प्रदोष काळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन रुक्मिणीला ७ विड्याचे पान , ७ सुपारीचा विडा तयार करून आवाहन – आमंत्रण करतात.

मकर संक्रांती (Makar Sankranti)  हा या सणाचे हिंदू धर्मामध्ये विषयच महत्व आहे. तसेच हा हिंदूंचा मुख्य सण आहे. आणि भोगी (Bhogi) हा या सणाचा पहिला दिवस मानला जातो. हा दिवस स्त्रियांसाठी विशेष असतो. भोगी (Bhogi) हा सण साजरा करण्याची एक विशिष्ट पद्धत असते. हा सण इंग्रजी कॅलेंडरनुसार नवीन वर्षातील पहिला सण मानला जातो. खास करून या दिवशी पाण्यात तीळ मिसळून आंघोळ केली जाते. शरीरात उष्णता आणि येणार उन्हाळा सुखमय जावा म्हणून आंघोळीच्या पाण्यात तीळ मिसळून आंघोळ केली जाते.पुराणानुसार असे म्हटले जाते की भोगीच्या दिवशी भगवान इंद्राला आव्हान दिल जातं, त्यांना स्मरूनच त्यांची पूजा केली जाते. इंद्रानंच पृथ्वीवर अमाप पिक (crops) पिकावीत असा आशीर्वाद दिला होता. हीच पिकं आजपर्यंत सर्वांचीच भूक भागवत आली आहेत , अनेकांना समृद्ध करत आली. हेच चक्र अनंत काळापर्यंत चालत रहावं या हेतूनं प्रार्थना करत आजचा दिवस त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा असतो. भोगी या दिवशी केस धुवून शरीरातील नकारात्मक शक्तींचा नायनाट करण्याचा संदेश दिला जातो. तसंच विविध रोगांपासून मुक्तता मिळण्यासाठी प्रार्थनाही केली जाते.

भोगी (Bhogi) हा सण देशातील अनेक राज्यांमध्ये विविध पद्धतींनी साजरी केली जाते. एकट्या महाराष्ट्रातच भोगी (Bhogi) हा सण साजरा करण्याची विविध रुपं पाहायला मिळतात. कोकण, मराठवाडा, विदर्भ, कोकण या सर्व भागांमध्ये भोगी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि त्या त्या ठिकाणची विशेष भोगीची भाजीचा आहारात समावेश केला जातो.

हे ही वाचा:

 मागण्या पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी ठाम, १२ तासांहून अधिक काळ लोटला तरी आंदोलन सुरूच

मकर संक्रांतीच्या खास दिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या ‘या’ खास शुभेच्छा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss