Makar Sankranti 2023, एक दिवस आधी साजऱ्या केल्या जाणाऱ्या भोगीचं आणि मकर संक्रांत यांचं काय बरं नातं ?

इंग्रजी नवं वर्ष लागून अवघे काही दिवसच झाले आहेत. आणि नवं वर्ष चालू झाले की सर्वांना वेध लागतात ते मकर संक्रांती या सणाचे. मकर संक्रांती या सणाच्या आधीचा दिवस हा ‘भोगी’ (Bhogi) म्हणून साजरा केला जातो.

Makar Sankranti 2023,  एक दिवस आधी साजऱ्या केल्या जाणाऱ्या भोगीचं आणि मकर संक्रांत यांचं काय बरं नातं ?

इंग्रजी नवं वर्ष लागून अवघे काही दिवसच झाले आहेत. आणि नवं वर्ष चालू झाले की सर्वांना वेध लागतात ते मकर संक्रांती या सणाचे. मकर संक्रांती या सणाच्या आधीचा दिवस हा ‘भोगी’ (Bhogi) म्हणून साजरा केला जातो. ‘न खाई भोगी तो सदा रोगी’ असं आपल्या घरातल्यांकडून आपण नेहमी ऐकत असतो. परंतु ही भोगीची नेमकी भानगड आहे तरी काय ? मकर संक्रात आणि भोगीची काय नातं आहे ? ती का साजरी केली जाते? याबाबतची आज आम्ही माहिती तुम्हाला देणार आहोत. ‘भोगी’हा इंग्रजी नवीन वर्षातील पहिला मानाचा सण असतो.

भोगी चा अर्थ म्हणजे भोगणे असा होतो. परंतु हे भोग चांगल्या अर्थाने उपभोगा, असे सांगितले आहे. भोगी या शब्दाचा अर्थ उपभोग घेणारा असा होतो. उत्सवाच्या क्षणांना मनावरचे मळभ दूर करून प्रत्येक क्षण साजरा करा, उपभोगून घ्या, असा त्याचा अर्थ आहे. कारण इंग्रजी वर्षाची सुरुवात या मकर संक्रांतीच्या सणाने होते. हा सण आयुष्याचा गोडवा वाढवणारा आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) ग्रामीण आणि शहरी भागात भोगी हा उपभोगाचा सण म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण देशात हा सण साजरा केला जातो. तसेच या सणाला प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या नावानी ओळखले जाते. तामिळनाडूत हा सण ‘भोंगीपोंगल’ म्हणून साजरा करतात तर ‘भोगली बहू’ म्हणून आसाममध्ये साजरा करतात. तसेच पंजाबमध्ये ‘लोहिरी’,‘उत्तरावन’ म्हणून राजस्थानमध्ये साजरा केला जातो.

संक्रांती आणि भोगी हे दोन्ही सण हे जानेवारी महिन्यात म्हणजेच थंडीच्या दिवसात येत असतात. अश्या थंडगार वातावरणात गरम गोष्टी, भाज्या खाणं शरीरास फायदेशीर असते. म्हणून या सणाचे औचित्य साधून या दिवशी खास करून भोगीची भाजी बनवली जाते. भोगी हा सण इतर सणाप्रमाणे खास असल्यामुळे या सणाचे महत्वही तितकंच खास आहे. वटाण्याच्या शेंगा म्हणजेच मटार, गाजर, वांगी, घेवडा, वालाच्या शेंगा, हरबरा, तीळ आदी या सर्व भाज्या एकत्र करून, त्यात तिळाचे कूट घालून भोगीची भाजी तयार करतात. तीळ लावून बाजरीची भाकरी करतात. भाकरीसोबत खायला वांग्याचं भरीत केलं जातं. तर काही भागात भाकरी लोण्यासह खातात. विशेषत्वाने, मुगाच्या डाळीची खमंग खिचडीही या दिवशी बऱ्याच ठिकाणी केली जाते. भोगी या सणाच्या माध्यमातून आपला आहार हा संतुलित आणि पौष्टिक घेण्याचा सल्ला ग्रामीण संस्कृती देते. या पदार्थांमधून उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा वर्षभर कामाला लागतो. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात हा सण साजरा करतात. मकरसंक्रांतीच्या दिवशी लागणारे तिळगूळ भोगीच्या दिवशी तयार करतात.

हे ही वाचा:

लवकरच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ धडाडणार शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात

अश्या प्रकारे सुरु झाली Prasad – Manjiri Oak च्या प्रेमाची अनोखी कहाणी, पोस्ट होतेय व्हायरल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version