Makar Sankrnati 2023, संक्रांती संदर्भात काही विशेष बाबी घ्या जाणून

सूर्य एका राशीतून दुसर्‍या राशीत प्रवेश करतो अर्थात संक्रमण करतो त्या वेळेला संक्रांती असे म्हंटले आहे. सूर्य मालेतील प्रत्येक ग्रहाच्या भ्रमणाची गती मोजण्याचे प्रमाण निश्चित ठरलेले आहे.

Makar Sankrnati 2023, संक्रांती संदर्भात काही विशेष बाबी घ्या जाणून

पौष कृष्ण ७ शके १९४४ शनिवार दि १५ / ०१ / २०२३ रोजी मकर संक्रांत

संक्रांती तत्त्व निर्णय –

सूर्य एका राशीतून दुसर्‍या राशीत प्रवेश करतो अर्थात संक्रमण करतो त्या वेळेला संक्रांती असे म्हंटले आहे. सूर्य मालेतील प्रत्येक ग्रहाच्या भ्रमणाची गती मोजण्याचे प्रमाण निश्चित ठरलेले आहे. ज्या ग्रहांचे राश्यांतर होणार आहे त्याच्या त्या गुणधर्माप्रमाणे त्या काळास विशिष्ठ ओळख असते.

सूर्य ज्यावेळी राशी प्रवेश करतो त्यावेळेचा सुरुवातीचा भ्रमण काळ हा पुण्यकाळ म्हणून संबोधला जातो व त्याचे इष्टानिष्ट परिणाम देखील शास्त्रकारांनी अभ्यासून त्याचा संदर्भ विविध ग्रंथामध्ये लिहून ठेवलेला आढळतो.

रवेः संक्रमणं राशौ संक्रान्तिरिति कथ्यते।
अशा बारा संक्रांती मध्ये मकरादि सहा आणि कर्कादि सहा राशिंच्या भोगकालात क्रमशः उत्तरायण आणि दक्षिणायन हे दोन अयन होतात.

मकरकर्कटसंक्रान्तिक्रमेणोत्तरायणं दक्षिणायनं स्यात्।
त्याशिवाय मेष आणि तुळेच्या संक्रान्तिची ‘विषुवत्’; वृष, सिंह, वृश्चिक आणि कुम्भ ‘विष्णुपदी’ आणि मिथुन, कन्या, धनु व मीन ‘षडशीत्यानन’ संज्ञा होते.

अयने द्वे विषुवती चतस्रः षडशीतयः ।
चतस्रो विष्णुपद्यश्च संक्रान्त्यो द्वादश स्मृताः ॥ (वसिष्ठ)
अयन आणि संक्रान्तिच्या वेळी व्रत-दान या जपादि करण्याच्या विषयांत ‘हेमाद्रि” च्या मतानुसार संक्रमण होण्यापूर्वी आणि संक्रमणानंतर १५-१५ घटीचा पुण्यकाल होतो.

अधः पञ्चदश ऊर्ध्वं च पञ्चदशेति। (हेमाद्रि)
त्याचप्रमाणे ‘बृहस्पति’ च्या मतानुसार दक्षिणायनाचे पहले आणि उत्तरायणाचे नंतरचे २०-२० घटी पुण्यकालाच्या रूपात परिगणित आहे.

संक्रान्तिसमयः सूक्ष्मो दुर्जेयः पिशितेक्षणैः ।।तद्योगाच्चाप्यधश्चोर्ध्वं त्रिंशत्राड्यः पवित्रिताः । (देवल)
यामध्ये ‘वसिष्ठ’ मतानुसार ‘विषुव’ च्या मधली, विष्णुपदी आणि दक्षिणायनच्या पहिली तसेच षडशीतिमुख आणि उत्तरायणच्या नंतरची वेळा पुण्यकाळाच्या होतात.

मध्ये तु विषुवे पुण्यं प्राग्विष्णौ दक्षिणायने।
षडशीतिमुखेऽतीते अतीते चोत्तरायणे ॥ (वसिष्ठ)
यामध्ये विशेष आहे की दिवसा संक्रान्ति असेल तर पूर्ण दिवस, अर्धरात्रिच्या पूर्वी असेल तर त्या दिवसाचा उत्तरार्ध, अर्धरात्रिच्या नंतर असेल तर येणार्‍या दिवसाचा पूर्वार्ध पुण्य काल असतो.

अह्नि संक्रमणे पुण्यमहः सर्वं प्रकीर्तितम्।
रात्रौ संक्रमणे पुण्यं दिनार्धं स्नानदानयोः॥
अर्धरात्रादधस्तस्मिन् मध्याह्नस्योपरि क्रिया।
ऊर्ध्वं संक्रमणे चोर्ध्वमुदयात्प्रहरद्वयम्॥ (वसिष्ठ)

– ज्यो. रवींद्र पाठक गुरुजी , ठाणे
8108266672

Exit mobile version