spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अशा पद्धतीने घरच्या घरी तयार करा बाप्पाची मूर्ती…

काहीजण घरच्याघरी बाप्पाची मूर्ती तयार करून देखील गणेशोत्सवाची तयारी करतात

गणेशोत्सव म्हटला की प्रत्येकजणच आपल्या परीने तयारीला लागतो. मग ती तयारी गणपती बाप्पासाठी मखर तयार करण्याची असुदे किंवा मग इतर सजावटीचे समान खरेदी करण्याचे असो. पण, प्रत्येकजण हा फक्त काही सजावट किंवा खाण्याच्या पदार्थांची तयारी करूनच हा सण साजरा करत नाहीत. तर, काहीजण घरच्याघरी बाप्पाची मूर्ती तयार करून देखील गणेशोत्सवाची तयारी करतात. मग तुम्हालाही करायचीय का गणेशोत्सवाची अशी तयारी? चला तर मग जाणून घेऊया पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करण्याच्या काही सोप्या पायऱ्या:

साहित्य: टेरकोटा माती किंवा चिकणमाती, पेन, पेन्सिल किंवा टूथपिक आणि पाणी.

पायऱ्या:

  • माती आणि पाणी मिसळून, नीट मळून एक घट्ट डो तयार करून घ्या.
  • त्यानंतर एक मातीचा गोळा घेऊन चौरस किंवा आयताकृती पाया तयार करून घ्या.
  • एक लहान गोळा तयार करून तो या चौकोनावर बसवा आणि पाणी आणि टूथपिकने तो नीट जोडून घ्या.
    मग अजून एक गोळा तयार करून त्याच्यापासून गणपतीचे धड तयार करून घ्या आणि तेही पाण्याच्या मदतीने नीट चिकटवून घ्या.
  • त्यानंतर छोटे लांबट गोळे तयार करून हात आणि पायाच्या जागी टूथपिकने जोडून घ्या.
  • अजून लहान गोळे तयार करून हातचे आणि पायाचे पंजे तयार करून घ्या.
  • आशीर्वाद देणारा हाथ थोडा सपाट आणि दुसरा थोडा खोलगट तयार करून घ्या.
  • त्यानंतर गणपतीचे दागिने आणि कपडे टूथपिकचा वापर करून कोरून घ्या.
  • मग कान, डोळे आणि बाप्पाचा लाडका मोदक लहान लहान गोळ्यांपासून तयार करून घ्या.
  • मूर्ती पूर्णपणे जोडून झाल्यावर तुम्ही ती रात्रभर सुकवू शकता किंवा मग उन्हात सुकावु शकता.

हे ही वाचा:

रतन टाटा यांचा ‘गुडफेलोज’च्या माध्यामतून सामाजिक उपक्रम

मालकासह डिलिव्हरी करण्यासाठी फिरणाऱ्या कुत्र्याचा व्हिडिओ होतोय व्हायरल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss