Margashirsha Laxmi Pooja 2022 : महिलांनो मार्गशीर्ष महिन्याचं व्रत करताय ? मग आता एक क्लिकवर व्हा प्रसिद्ध

नोव्हेंबर महिना चालू झाल्यावर महिला वर्ग महालक्ष्मीचे व्रत करायला सुरुवात करतात. महालक्ष्मी व्रत केल्याने घरात सुख - शांती राहते. महालक्ष्मी व्रताला डिसेंबर महिन्यात खूप महत्व असते.

Margashirsha Laxmi Pooja 2022 : महिलांनो मार्गशीर्ष महिन्याचं व्रत करताय ? मग आता एक क्लिकवर व्हा प्रसिद्ध

नोव्हेंबर महिना चालू झाल्यावर महिला वर्ग महालक्ष्मीचे व्रत करायला सुरुवात करतात. महालक्ष्मी व्रत केल्याने घरात सुख – शांती राहते. महालक्ष्मी व्रताला डिसेंबर महिन्यात खूप महत्व असते. हे महालक्ष्मी व्रत फक्त गुरुवारी केले जाते. मार्गशीर्ष महिन्यातील ४ गुरुवार हे व्रत केले जाते. तसेच यंदाच्या वर्षी मार्गशीष २३ नोव्हेंबर २०२२ पासून सुरु होत आहे. तर पहिला गुरुवार हा दि. २४ नोव्हेंबर २०२२ रोजी आहे.

यंदाच्या वर्षी २४ नोव्हेंबर २०२२ पासून मार्गशीर्ष महिन्यातील गुरूवारला सुरूवात होतेय. अनेक स्त्रिया महालक्ष्मीचा हा उपवास मनोभावे करतात. या उपवासामागे प्रत्येकाची काही ना काही श्रद्धा असते. या मार्गशीर्षच्या दिवसांमध्ये प्रत्येक गुरूवारी व्रत करत संपूर्ण दिवस उपास धरतात. एकूण चार गुरूवारी वैभव लक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत केलं जातं. कुमारिका आणि सुहासिनी महिला हे व्रत मोठ्या श्रद्धेने करत असतात. शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते. सुद्धा शेजारपाजारच्या सवाष्ण स्त्रिया हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करत वैभव लक्ष्मी व्रतकथेचे पठण करतात. शेवटल्या गुरुवारी पाच कुमारिका किंवा पाच सवाष्णींना बोलावून हळद-कुंकू, फळं, दक्षिणा आणि महालक्ष्मी व्रत कथा पुस्तक देऊन त्यांचा सत्कार करावा. या व्रत कथेमागे श्रद्धेचा भाग असतो. त्याचप्रमाणे या उपवासात अनेक व्रतवैकल्प पूर्ण केले जातात.

महाराष्ट्रात अनेक महिला हे व्रत करतात. अनेकांनी सर्व खरेदी देखील नक्कीच केली असेल. तर उद्यापासून हे उपवास चालू होणार आहेत प्रत्येक महिला स्वतः तर सुंदर रित्या सजतेच पण आपल्या देवीला म्हणजे जे घट मांडतात त्याला देखील सुंदर सजवले जाते. देवीला साडी, दागिने , फुल सर्व साज शृंगार करून सजवले जाते. तर मग यंदाच्या वर्षी तुमचे आणि तुमच्या देवीचे किंवा उद्यापनाचे सुंदर फोटो टाईम महाराष्ट्रासोबत शेअर करा. आम्ही हे फोटो इंस्टाग्राम आणि वेबसाईटच्या माध्यमातून प्रसारित करू.

फोटो पाठवण्याचा कालावधी – २४ नोव्हेंबर २०२२ – १८ डिसेंबर २०२२

आम्हाला तुमचे फोटो, नाव, ठीकाण व्हाट्सअँप द्वारे पाठवा.

Whats App No – 9769612336

Time Maharashtra –

Website –https://www.timemaharashtra.com/
Instagram – https://www.instagram.com/timemaharashtra/
You Tube – https://www.youtube.com/@TimeMaharashtra/featured
Facebook – https://www.facebook.com/timemaharashtra/
Whatsapp Group – https://chat.whatsapp.com/K0ccH9o61cT1eHNPehAKJO

हे ही वाचा : 

Margashirsha Laxmi Pooja 2022 : श्री महालक्ष्मी व्रताची कथा, कहाणी गुरुवारची …

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version