spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

MARGASHIRSHA LAXMI POOJA 2022 : मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीची पूजा विधी घ्या जाणून…

नोव्हेंबर महिना चालू झाल्यावर महालक्ष्मीचे व्रत करायला सुरुवात होते. महालक्ष्मी व्रत केल्याने घरात सुख शांती राहते. महालक्ष्मी व्रताला डिसेंबर महिन्यात खूप महत्व असते. हे महालक्ष्मी व्रत फक्त गुरुवारी केले जाते. फक्त ४ गुरुवार हे व्रत केले जाते. तसेच मार्गशीष २४ नोव्हेंबर २०२२ पासून सुरु होत आहे. आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून श्री महालक्ष्मी व्रताची पूजा विधी सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

 

महालक्ष्मीची पूजा करतांना पूजा करण्याची जागा स्वच्छ धुवून घ्या. सुंदर रांगोळी काढून घ्या. रांगोळी काढताना स्वस्तिकची रांगोळी काढून घ्यावी आणि त्यावर चौरंग ठेवून द्यावा. चौरंग ठेऊन झाल्यानंतर चौरंगाच्या आजूबाजूने रांगोळी काढून घ्या. त्यानंतर चौरंगावर लाल रंगाचा कापड घालून घ्या. त्यावर तांदूळ किंवा गहू घेऊन चौरंगावर व्यवस्तिथ मांडून घ्या. नंतर एक कळस घ्यावा आणि त्या कळसावर हळद कुंकुने स्वस्तिक काढून घ्या. त्या कळसमध्ये हळद, कुंकू, शिक्का, थोडे तांदूळ, दूर्वा, पाणी घालून घेणे. कळसच्या आजूबाजूला पाच वेगवेगळया प्रकारची पाने लावून घेणे. जसे आंबेची, पेरूची, अशी पाने लावून घेणे, आणि मधोमध नारळ ठेऊन देणे. त्यानंतर तो कळस चौरंगावर ठेऊन द्यावा. चौरंगावर ठेवल्यानंतर महालक्ष्मीला साडी, दागिने, नथ घालून घेणे. (जर तुमच्याकडे साडी, दागिने, नथ हे सामान असेल तर घाऊ शकता किंवा फक्त कळस देखील ठेवू शकतात)

लक्ष्मी घट मांडून झाल्यानंतर चौरंगावर चारही बाजूने फळॆ मांडून घेणे. एक पानाचा विडा ठेऊन देणे, आणि महालक्ष्मी समोर तुपाचा दिवा लावणे. लक्ष्मीची पूजा करताना पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चना करावी. नैवेद्य दाखवतांना फळांचा, दुधाचा नैवेद्य , गोड शिरा, अश्या वेगवेगळया पद्धतीने नैवेद्य देवीला दाखवणे. देवीला कमळाचे फुल अर्पण करावे, लक्ष्मी पूजा झाल्यानंतर सर्व कुटुंबाने एकत्रित येऊन देवीची आरती करून घ्यावी. पोथी(महालक्ष्मीचे पुस्तक) वाचून घ्यावी. पोथी वाचताना महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी ही पोथी वाचावी. असे केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतील. नंतर पूजा झाल्यानंतर देवीला जेवण्याचा नैवेद्य दाखवा नैवेद्य दाखवताना केळीच्या पानात दाखवावं आणि गायीसाठी एक पान वेगळे काढावे. नंतर कुटुंबासोबत आनंदाने भोजन करून घ्यावे. दुसऱ्या दिवशी कलशामधील पाणी घरात थोडे शिंपडावे आणि नंतर पाणी तुळशीच्य झाडाला घालून घ्यावे.

हे ही वाचा : Margashirsha Laxmi Pooja 2022 : श्री महालक्ष्मी व्रताची कथा, कहाणी गुरुवारची …

 

Latest Posts

Don't Miss