Margashirsha Laxmi Pooja 2022 : श्री महालक्ष्मी व्रताची कथा, कहाणी गुरुवारची …

Margashirsha Laxmi Pooja 2022 : श्री महालक्ष्मी व्रताची कथा, कहाणी गुरुवारची …

नोव्हेंबर महिना चालू झाल्यावर महालक्ष्मीचे व्रत करायला सुरुवात होते. महालक्ष्मी व्रत केल्याने घरात सुख शांती राहते. महालक्ष्मी व्रताला डिसेंबर महिन्यात खूप महत्व असते. हे महालक्ष्मी व्रत फक्त गुरुवारी केले जाते. फक्त ४ गुरुवार हे व्रत केले जाते. तसेच मार्गशीष २४ नोव्हेंबर २०२२ रोजी पासून सुरु होत आहे. आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून श्री महालक्ष्मी व्रताची कथा या बद्दल सांगणार आहोत.

श्री महालक्ष्मीचे नावे रूपे अनेक आहेत. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी,सावित्री, राधिका, रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा नावांनी श्रीमहालक्ष्मी ओळखली जाते. अशी सर्वाभूती असल्याने श्री महालक्ष्मीची कहाणी आहे. ही कहाणी एका द्वापार-युगातली भारतात सौराष्ट्र देशात घडलेली कहाणी आहे. त्या द्वापार-युगात एक राजा राज्य करत होता. आणि तो भद्रश्रवा या नावानी ओळखला जात होता. तसेच भद्रश्रवा राजा हा शूर आणि दयाळू होता. तसेच त्याला चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे असे सम्यक ज्ञान त्याला होते. त्या राज्याच्या राणीचे नाव सुरतचंद्रिका होते, राणी दिसायला सुंदर आणि सुलक्षणी होती. त्या दोगांना एकूण ८ मुले होते, आणि त्या सात मुलांवर एक मुलगी जन्माला आली होती. आणि त्या कन्येचे नाव शामबाला ठेवले होते.

 

एकदा श्री महालक्ष्मीच्या मनात आले की आपण राज्याच्या राजप्रसादी जाऊन राहावे. त्यामुळे राज्याला अनेक सुख प्राप्त होईल. आणि तो त्याचा प्रजेला भरपूर सुख देखील. जर ती संपत्ती गरिबाकडे राहिली तर तो एकटाच त्याचा फायदा घेईल. म्हणून श्री महालक्ष्मीने म्हातारीचे रूप घेतले, आणि फाटके वस्त्र परधान केले, आणि काठी टेकत टेकत सुरतचंद्रिकाच्या महालासमोर आली. तिला पाहाताच एक दासी पुढे आला, आणि त्या दासीने त्या म्हातारीला विचारले की कोण ग तू ? कुठून आलीस ? काय काम काढलंस ? नाव काय तुझे ? तुझे गाव कोणते ? तुला काय हवं ? असे प्रश्न दासीने म्हातारीला विचारले. महालक्ष्मीच्या रूपात म्हातारी म्हणाली की बाळ माझे नाव कमळाला आम्ही द्वारकेला राहतो. मी राणीला भेटायला आली आहे. कुठे आहे राणी ? दासीने सांगितले की राणी तर महालात आहे. दासी त्या म्हातारीला म्हणजेच महालक्ष्मीला म्हणाली की मी जर राणी साहेबाना सांगायला गेली तर त्या माझ्यावर रागावतील तुझा असा अवतार पाहून तुला ते हाकलूवून देतील, त्यावेळी महालक्ष्मी रागारागाने आणि तावातावाने तिकडून निघून घेली, आणि म्हणाली की तुझी राणी गेल्या जन्मात एका वैश्याची पत्नी होती. आणि तोफार गरीब होता. त्यावरून त्या दोघांची दरोरोज भांडणे होत असत. तिला तिचा नवरा खूप मार हान करायचा आणि ती त्याला कंटाळून निघाली आणि उपाशी पोटी भटकू लागली. तिची ती अवस्था पाहून मला दया आली. मी तिला सुख आणि संपत्ती देणार्‍या श्रीमहालक्ष्मी- व्रताचा महिमा सांगितला होता. आणि आणि तिला व्रत देखील करायला सांगितले होते. तिने ते व्रत केले आणि तिला सुख समृद्धी ऐश्वर्या प्राप्त झाले, या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे. आणि राणी या जन्मांत महालात राहू लागली आहे.

म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. तिने त्या म्हातारीला सांगितले की मला सांगा ते व्रत मी करेन. म्हातारीने दासीला लक्ष्मीव्रताचा महिमा सांगितला. आणि त्याच वेळी राणी महालातून बाहेर आली आणि त्या म्हातारीला म्हणाली उर्मट पणे बोली त्यामुळे महालक्ष्मी ने तिकडे न राहता तिकडून निघायचे ठरवले. त्या वेळी त्या राणीची मुलगी शामबाला तिकडे आली आणि तिने त्या म्हातारीची माफी मागितली माफी मागितल्यावर महालक्ष्मीला तिला तिची दया आली. आणि तिने शामबाला ते महालक्ष्मीचे व्रत सांगितले, आणि तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता. शामबालाने ते व्रत मनापासून केले आणि ती सिद्धेश्वर नावाच्या राजासोबत आनंदाने राहू लागली. मात्र इकडे राजा राणी वर कोप चालू होता. भद्रश्रवा राजा आपल्या कन्येच्या महालात गेला आणि थोडी तिला धनसंपत्ती मागितली तर तिने मडक्यात धनसंपत्ती देण्याऐवजी कोळसे दिले त्यामुळे सुरतचंद्रिका राणी खूप रागावली होती. त्यानंतर राणी जाब विचारण्यासाठी आपल्या कन्येच्या महालात गेली आणि तिने शामबाला महालक्ष्मी व्रत करताना पाहिले ते महालक्ष्मी व्रत शामबालाने तिचा आई कडून ही करवले आणि ती दोघे सुख समृद्धीने नांदू लागले अशा प्रकारे हे महालक्ष्मी व्रत जे कोणी करतील त्यांना महालक्ष्मीची कृपा होईल.

हे ही वाचा :

चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येण्यासाठी चिंचेपासून तयार करा फेस ब्लिच जाणून घ्या घरगुती उपाय

 

Exit mobile version