spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Navratri 2022 : नवरात्रीमध्ये गरबा आणि दांडयासाठी असा करा मेकअप

नवरात्री ( Navratri 2022 ) तरुणाईसाठी खास आकर्षण असते ते दांडिया, गरबाचे. कोरोनाच्या तब्बल २ वर्षांनी गरबासाठी तरुणाई थिरकणार आहे. अनेक ठिकाणी दांडिया नाइट्स तर काही ठिकाणी गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे . त्यासाठी हटके लूक करण्याची प्रत्येकाची धडपड सुरू असते. मग ड्रेस सिलेक्शन, डान्स प्रॅक्टिस, मेक अप यांसारख्या गोष्टी करण्यात येतात. पण तुम्हाला खरेच तुमचा लूक हटके करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या मेकअपकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नवरात्रीचे नऊ दिवस अनेक स्त्रिया कपड्यांमध्येही नवरंग ‘फॉलो’ करत आहेत. गरबेचे गाणी आपल्याला कानावर पडू लागली आहे . मित्रमैत्रिणीसोबत मिळून मस्त नटून, पारंपरिक पोशाख आणि दागिने घालून दांडिया खेळायला जाणे म्हणजे मजाच . काहीजणांना गरबा आणि दांडीयाला वेगवेगळे लूक करण्याची आवड असते . गरबा आणि दांडियाला जाताना जास्त डार्क मेकअप करू नये हलका आणि लाईट मेअकप करावा .

हे ही वाचा : Navratri 2022: नवरात्रीच हटके सेलिब्रेशन, स्विमिंग पूलमध्ये गरबा करतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल

 

पाण्याने किंवा फेस वॉशने तुम्ही चेहरा स्वच्छ धुवून घ्या .

नॅपकिनने चेहरा स्वच्छ पुसून घ्या . त्यानंतर मॉइश्चरायझर लावा आणि २ मिनिटे मसाज करून घ्या .

त्यानंतर तुमच्या त्वचेच्या रंगानुसार फाउंडेशन लावून घ्या .

 

फाउंडेशन लावून झाल्यानंतर त्यावर पावडर लावा . कपाळ, नाक, ओठांभोवती आणि हनुवटीवर पावडर व्यवस्थित लावावी, म्हणजे या जागी तेलकट झालं तरी ते लवकर दिसून येणार नाही.

डोळ्यांचा मेकअप करताना तुम्ही ड्रेसला मॅचनिंग असेल असा आयशॅडो तुम्ही लावू शकता किंवा त्याच्या विरुद्ध देखील आयशॅडो तुम्ही लावू शकता .

आयलायनर, काजळ, मस्कारा लावून आपला आय मेकअप पूर्ण करा.

भुवयांसाठी तुम्ही काळी पेन्शील देखील लावू शकता .

ब्लश आवडत असेल तर तुम्ही ते देखील लावू शकता .

तुम्ही म्यॅचिंग लिपस्टिक देखील लावू शकता . किंवा चेहऱ्याला शोभेल अशी तुम्ही लिपस्टिक लावू शकता .

हे ही वाचा : 

Navratri 2022 : नवरात्रीमध्ये मांढरदेवीची (काळूबाई) उपासना ठरते लाभदायक

 

Latest Posts

Don't Miss