Navratri 2022: यंदाची घटस्थापना आहे दरवर्षीपेक्षा विशेष… घ्या जाणून शुभ मुहूर्त

हिंदू कॅलेंडरनुसार, दरवर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून होते. सर्वपितृ अमावस्येच्या (Sarva Pitru Amawasya) दुसऱ्या दिवसांपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होते.

Navratri 2022: यंदाची घटस्थापना आहे दरवर्षीपेक्षा विशेष… घ्या जाणून शुभ मुहूर्त

हिंदू कॅलेंडरनुसार, दरवर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून होते. सर्वपितृ अमावस्येच्या (Sarva Pitru Amawasya) दुसऱ्या दिवसांपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होते. यावर्षी शारदीय नवरात्रीची (Navratri 2022) सुरुवात २६ सप्टेंबरपासून होईल आणि त्यानंतर ५ ऑक्टोबरला दसरा किंवा विजयादशमी (Vijayadashmi) उत्सव साजरा केला जाईल. दुर्गा अष्टमी व्रत, अष्टमी तिथीला कन्यापूजन, नवमी तिथीला महानवमी आणि दशमी तिथीला दसरा किंवा विजयादशमी हे सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.

Navratri 2022 : काय आहे नवरात्रातील अखंड ज्योतचं महत्व ? घ्या जाणून

माता दुर्गेच्या उपासनेचा हा ९ दिवसांचा सण या वर्षी अतिशय शुभ योगाने सुरू होत आहे. या शुभ मुहूर्तावर घटस्थापना केल्याने लोकांच्या जीवनात सुख-समृद्धी येईल अशी मान्यता आहे. गुजरात, मध्य प्रदेश, पंजाब-हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमध्ये शारदीय नवरात्री आणि दुर्गापूजेचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

यंदा अश्विन महिन्यातील नवरात्रीमध्ये माता दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येत आहे. हत्ती वाहन हे अतिशय शुभ मानले जाते. हत्ती हे संपन्नतेचे प्रतिक आहे. माता दुर्गेची हत्तीची सवारी शेती आणि पिकांसाठी शुभ मानली जाते. यंदाचे नवरात्र हे आर्थिक भरभराटीचे आणि उन्नतीचे ठरणार आहे.

Navratri 2022 : नवरात्र हा सण का साजरा केला जातो ?

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशाच्या स्थापनेनंतर दुर्गा देवीचे पहिले रूप शैलपुत्री देवीची पूजा केली जाते. बहुतेक लोक या दिवशी नवरात्रीचा पहिला उपवास करतात. ज्यांना नवरात्रीचे ९ दिवस उपवास करता येत नाहीत, ते पहिल्या दिवशी आणि दुर्गा अष्टमीला उपवास करतात. याला नवरात्रीचे आरोह-अवरोह असे म्हणतात. तर महाष्टमीच्या दिवशी कन्यांची पूजा केली जाते आणि महानवमी किंवा दशमीला हवन केले जाते. मात्र अनेक ठिकाणी दुर्गा अष्टमीच्या दिवशी हवन केले जाते. जरी लोक पूर्ण ९ दिवस उपवास ठेवतात, तरी ते नवमी किंवा दशमीला हवन करतात आणि दसऱ्याच्या दिवशी पारण करतात.

शुभ योग –

२६ सप्टेंबर २०२२ पासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेसाठी संपूर्ण दिवस अतिशय शुभ असेल. यादरम्यान शुक्ल आणि ब्रह्मयोगाचा अप्रतिम संगम तयार होत आहे. जी धार्मिक पूजा आणि शुभ कार्यांसाठी अत्यंत शुभ मानली जाते. यानंतर सोमवार, ३ ऑक्टोबर रोजी महाष्टमीची व्रत-पूजा होणार आहे. दुर्गापूजेसाठी, अष्टमी-नवमी तिथीच्या संधि पूजेचा मुहूर्त दिवसाच्या ३:३६ ते ४:२४ पर्यंत असेल. त्याच वेळी, महानवमी तिथी मंगळवार, ४ ऑक्टोबर रोजी असेल. नवमी तिथी दुपारी ०१.३२ पर्यंत राहील. यानंतर दशमी तिथी सुरू होईल. त्यामुळे विजयादशमी किंवा दसरा सण ४ आणि ५ ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी दुर्गा मूर्तींचे विसर्जन केले जाते, रावणाचे दहन केले जाते आणि त्यासोबत शस्त्रे व वाहनांची पूजा केली जाते.

 

हे ही वाचा:

Navratri 2022 : नवरात्रीमध्ये कळस स्थापनेचे महत्व आणि पूजा विधी कशी करायची?, जाणून घ्या

Navratri 2022 : दुर्गा मातेने अप्सरचे रूप धारण करून, केला महिषासुराचा वध

Navratri 2022 : नवरात्रीचा उपवास करताय ? तर हि बातमी तुमच्यासाठी खास…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version