Tuesday, October 1, 2024

Latest Posts

Navratri 2024 : नवरात्रीमध्ये उपवास करताय? तर ‘या’ नियमाचे नक्की करा पालन…

यंदा ३ ऑक्टोबर २०२४ पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे. धार्मिक मान्यतेनुसार, नवरात्रौत्सव विधिवत पूजनासह व्रत केले पाहिजे. असे केल्याने भक्तांना सुख-समृद्धी प्राप्त होत. अशात अनेक जण भक्ती भावांनी देवीची उपासना करतात.हिंदू धर्मामध्ये शारदीय नवरात्रौत्सवला विशेष महत्त्व आहे. ३ ऑक्टोबर पासून नवरात्रीला प्रारंभ होत असून १२ ऑक्टोबर रोजी विजयी दशमी आणि दुसऱ्या दिवशी दुर्गा देवीचे विसर्जन केले जाईल. धार्मिक मान्यतेनुसार, नवरात्रौत्सवत पूजा-अर्चनासह व्रत केले जाते. नवरात्रीमध्ये देवीची पूजा,व्रत केल्याने भक्तांना सुख-समृद्धी प्राप्त होते. अशात तुम्ही सुद्धा नवरात्री मध्ये उपवास करत असाल तर काही गोष्टी आवर्जून पाळल्या पाहिजे. असे केल्याने दुर्गा देवीची कृपा आपल्यावर राहते. अनेकवेळा आपण नकळत काही गोष्टीचे सेवन करतो ज्यामुळे आपला उपवास खंडित होतो आणि आपल्याला त्याची जाणीवही नसते. तर जाऊन घेऊया शारदीय नवरात्रीमध्ये उपवास करताना कोणत्या पदार्थाचे सेवन करावे आणि कोणत्या पदार्थाचे सेवन करू नये.

नवरात्रीत उपवासा दरम्यान पाळा हे नियम- नवरात्रीमध्ये नऊ दिवस माता दुर्गेच्या ९ रूपाची आराधना केली जाते. ९ दिवस देवीच्या नऊ रूपानं समर्पित आहे. त्यानुसार जी तिथी ज्या देवीला समर्पित आहे, त्यानुसार त्या देवीची पूजा केली जाते. देवीच्या व्रत दरम्यान कोणत्याही तामसिक पदार्थांचे सेवन करू नये. तसेच या काळात पवित्रतेची विशेष काळजी घ्यावी. उपवास करणाऱ्या व्यक्तीने क्रोध, लोभ,वासना, आणि आसक्तीपासून दूर राहावे. मुलींना देवी दुर्गेचे रूप मानले जाते.त्यामुळे नवरात्री मध्ये व्रताचे पारण नेहमी कन्या पूजनाने केली जाते. त्यामुळे मुली आणि महिलांचा आदर करा. पूजा करताना नेहमी दुर्गा चालीसा आणि दुर्गा सप्तशती पाठ करा. नवरात्रीत घरामध्ये कांदा, लसूण खाणे टाळा. तुम्ही नवरात्रीदरम्यान कलश,अखंड दिवा, घटस्थापना केली असेल तर घर कधीही रिकामे ठेऊ नका. नियंत्रण ठेवले पाहिजे. नवरात्रीमध्ये व्रत करणाऱ्या व्यक्तीने खोटे बोलू नये आणि सत्याचे पालन करावे.

हे ही वाचा:

सिनेट निवडणुकीप्रमाणे विधानसभेतही असाच विजय मिळवायचा आहे: Aaditya Thackeray

संविधानावरचा धोका अद्याप टळला नाही हे Prakash Ambedkar यांना सांगायची गरज नाही: Sanjay Raut

Latest Posts

Don't Miss