Navratri 2024 : भारतामधील या ५ दुर्गा मंदिरांना यंदाच्या नवरात्रीमध्ये नक्की भेट द्या…

Navratri 2024 : भारतामधील या ५ दुर्गा मंदिरांना यंदाच्या नवरात्रीमध्ये नक्की भेट द्या…

Navratri 2024 : भारतामधील प्रमुख सणांपैकी नवरात्री हा महत्वाचा सण आहे. नवरात्रीमध्ये अनेक जण नऊ दिवस दुर्गा मातेची मनोभावाने उपासना आणि पूजा करतात. नवरात्रीमध्ये नऊ दिवस दुर्गादेवीच्या नऊ रूपाची पूजा केली जाते. भारतामधील ही ५१  शक्तिपीठे हिंदूंसाठी प्रमुख आणि आदरणीय प्रार्थनास्थळे आहेत. जिथे पौराणिक कथेनुसार देवी सतीच्या शरीराचे अवयव पडले.जर तुम्ही नवरात्री दरम्यान दुर्गा मंदिरांना भेट देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही भारतामधील या प्रसिद्ध दुर्गा मंदिरांना भेट देऊ शकतात.

भारतामधील दुर्गा मातेचे ५ प्रसिद्ध मंदिरे

गुवाहाटीमधील माता कामाख्या मंदिर – भारतातील गुवाहाटी येथील देवी कामाख्या मंदिर हे प्रमुख शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. गुवाहाटी येथील एका गुहेच्या आत योनीची मूर्ती आहे, जी मूर्ती पवित्र मानली जाते. या मंदिरामध्ये देवीचे दर्शन करण्यासाठी दरवर्षी देशभरातून लोक येतात. नवरात्रीमध्ये येथे मोठ्या उत्सवात हा उत्सव साजरा केला जातो.

उज्जैनमधील महाकाली मंदिर – मध्यप्रदेशातील क्षिप्रा नदीच्या काठावर असलेल्या उज्जैनमधील एका लहानशा टेकडीवर वसलेले महाकाली देवीचे मंदिर आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार, देवी सतीचा वरचा ओठ आज जिथे हे मंदिर आहे त्या जमिनीवर पडला होता. देवी सरस्वती, महालक्ष्मी आणि ग्रह कालिका या इतर देवी रूपांची इथे पूजा केली जाते.

कोलकातामधील कालीघाट मंदिर – कोलकातामधील या मंदिरामध्ये नवरात्रीच्या वेळी दुर्गापूजा मोठ्या उत्सवात साजरी केली जाते. आज हे मंदिर जिथे आहे तिथे सतीदेवीच्या उजव्या पायाच्या पायाची बोट पडली होती अशी पौराणिक धारणा आहे. कालीघाट मंदिरात एप्रिल आणि ऑक्टोबर नवरात्री महिन्यात हजारो भाविकांची गर्दी असते. हे प्रमुख मंदिर २००० वर्षाहून अधिक जुने आहे.

जमू आणि काश्मीर मधील माता वैष्णवीदेवी मंदिर – कटरा जिल्ह्यातील वैष्णवीदेवीच्या दर्शनासाठी वर्षभर लाखो भक्त येतात. देशामधील १०८ शक्तिपीठांपैकी हे एक आहे. वैष्णो देवी ही दुर्गा देवीची एक रूप मानले जाते आणि मंदिराच्या पवित्र गुहेत खडकांच्या रूपात वास करते.

कर्नाटक म्हैसूर मधील चामुंडेश्वेरी मंदिर – हे मंदिर म्हैसूरमधील चामुंडी डोंगराच्या माथ्यावर वसलेले आहे. असे म्हंटले जाते येथे सतीचे केस पडले आणि नंतर १२ व्या शतकात होयसाळ राज्यकर्त्यांनी देवीच्या नावाने मंदिर बांधण्यात आले. या नवरात्रीमध्ये या पाच दुर्गा मंदिरांना नकी भेट द्या.

हे ही वाचा:

सिनेट निवडणुकीप्रमाणे विधानसभेतही असाच विजय मिळवायचा आहे: Aaditya Thackeray

संविधानावरचा धोका अद्याप टळला नाही हे Prakash Ambedkar यांना सांगायची गरज नाही: Sanjay Raut

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version