Wednesday, October 2, 2024

Latest Posts

Navratri 2024 : या नवरात्रीमध्ये ट्राय करा हे ४ सुपरफूड तुमच्या त्वचेसाठी असणार वरदान…, चला तर बघूया घरच्या घरी तुम्ही कसा वापर करू शकता?

चैत्र नवरात्रीला सुरुवात होणार असून या नवरात्रीमध्ये ट्राय करा काही सुपरफूड्स ज्यामुळे तुमची त्वचा राहील चांगली नवरात्रीमध्ये अनेक जण भक्ती भावाने देवीची पूजा करतात, उपवास करता. या दिवसामध्ये आपल्या आहारात अनेक बदल केले जातात. या काळात उपवासाला फळांव्यतिरिक्त शिंगाडा आणि राजगिऱ्याच्या पीठाचा वापर केला जातो. याशिवाय साबुदाणाचा आहारात समाविष्ट केला जातो. त्यामुळेच आरोग्याव्यतिरिक्त हे सुपरफूड त्वचेसाठी खूप प्रभावी ठरतात. तर तुम्हीही जाणून घ्या नवरात्रीचे सुपरफूड्स त्वचेसाठी कश्या प्रकारे फायदेशीर आहेत, हे सुपरफूड चेहऱ्यावर लावण्याचे फायदे…

राजगिराचा फेस पॅक- राजगिराचा वापर आपण त्वचेसाठी देखील केला जातो. राजगिराचा फेस पॅक Anti Aging साठी काम करते. हा फेस पॅक तयार करण्यासाठी एक चमचा राजगिरा पिठात एक चमचा ऐलोवेरा जेल, चिमूटभर कच्ची हळद आणि गुलाबपाणी मिसळून चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्यावरील बारीक रेषा अगदी कमी होऊ लागतात. आणि उन्हाळ्यात त्वचा तजेलदार राहते. घरगुती फेस पॅक चेहऱ्यावरती लावल्यामुळे चेहऱ्यावर मसाज करून त्वचेवरील मृत पेशी सहज काढता. येतात.

त्वचेवरील पुरळ दूर करण्यासाठी शिंगाड्याच्या पिठाचा वापर-शिंगाडा पिठाचा फेस पॅक तयार करण्यासाठी एक चमचा शिंगाड्याचे पीठ,एक चमचा संत्राच्या सालीची पावडर आणि १/२ चमचे बदाम तेल मिसळा त्यानंतर त्यामध्ये गरजेनुसार गुलाबजल टाका. ते चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटे ठेऊन नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा.

साबुदाणा फेस पॅक मुळे ग्लो वाढतो – साबुदाणा फेसपॅक तयार करण्यासाठी साबुदाणा भिजवावा. साबुदाणा मऊ झाल्यावर पेस्ट तयार करा आणि त्यात मुलतानी माती, मध आणि साखर घाला. आणि हे मिश्रण चेहऱ्यावर लावल्यानंतर चेहऱ्याला हलका मसाज करा आणि ५ ते ७ मिनिटांनी चेहरा धुवा.

टॅनिंगपासून संरक्षण करते कुट्टुचे पीठ – कुट्टुचे पीठ आरोग्यास लाभदायक असतं त्याच प्रमाणे त्वचेला देखील त्याचे फायदे असतात. पौष्टिकतेने भरपूर कुट्टुचे पीठचेहऱ्यावर लावल्याने त्वचेच्या असमान रंगाची समस्या कमी होते. यासाठी एक चमचा कुट्टुच्या पिठा मध्ये एक चमचा बेसन, आर्धा चमचा भर हळद आणि कच्चे दूध घाला. हे मिश्रण मिक्स करून चेहऱ्यावर लावा, १ ते २ मिनटे स्क्रब करा, १० मिनिटे राहू द्या नंतर चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे आपला चेहरा चमकदार राहतो.

हे ही वाचा:

Navratri 2024 : भारतामधील प्रसिद्ध अंबा मातेचे मंदिर कुठे आहेत बरं? घ्या जाणून…

Navratri 2024 : भारतामधील प्रसिद्ध अंबा मातेचे मंदिर कुठे आहेत बरं? घ्या जाणून…

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss